तरुण भारत

प्रो. फुटबॉल लढतीत चर्चिल ब्रदर्सचे यूथ मानोरावर तब्बल चार गोल

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

यूथ क्लब ऑफ मानोरा संघाचा एकतर्फी लढतीत 4-0 गोलानी पराभव करून चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविला.

Advertisements

काल हा सामना जीएफएच्या धुळेर फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आला. या विजयाने चर्चिल ब्रदर्सला 3 गुण प्राप्त झाले. चर्चिलसाठी सौरव मोंडलने दोन तर ऍरोन बार्रेटो आणि कुआन गोम्सने प्रत्येकी एक गोल केला. रेड मशीन संघाचे पूर्णता वर्चस्व लढतीवर आढळून आले. सामन्यातील पहिली धोकादायक चाल मात्र केली ती यूथ क्लब ऑफ मानोरा संघाने. यावेळी जौस्टन बार्बोझाने हाणलेला फटका चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक नोरा याने अडविल्यानंतर बचावपटू राजेंदर बैरोलाने चेंडू बाहेर लाथाडला.

त्यानंतर चर्चिलच्या ऍरोन बार्रेटो आणि सौरव मोंडल यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. दोन आक्रमणे वाया गेल्यानंतर 19व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सने पहिला गोल करून आघाडी घेतली. यावेळी अफदाल वारिकोड्डनने दिलेल्या पासवर ऍरोन बार्रेटोने मानोराचा गोलरक्षक ब्रॉडमन डोर्गारकरला भेदले आणि चेंडूला जाळीत टाकले. मानोरा संघाने त्यानंतर आक्रमणे रचून गोल बाद करण्याचे प्रयत्न केले. निक्लस नोरोन्हा, स्वीडन बार्बोजा व इल्डॉन कुलासोचे यावेळी गोल करण्याचे यत्न हुकले.

मध्यंतरावेळी कुआन गोम्सच्या क्रॉसवर सौरव मोंडलने गोल करून चर्चिल ब्रदर्स संघाची आघाडी दोन गोलानी वाढविली. दुसऱया सत्रात कुआन गोम्सने केलेल्या कॉर्नरवर सौरव मोंडलने हेडरने तिसरा तर 72व्या मिनिटाला कुआन गोम्सने डारयेक्ट फ्रिकीकवर चर्चिल ब्रदर्सचा चौथा गोल करून विजय आणखी सोपा केला. आज शनिवारी या स्पर्धेत वास्को स्पोर्ट्स क्लब आणि स्पोर्टिंग क्लुब दी गोवा यांच्यात धुळेर मैदानावर लढत होईल. 

Related Stories

पैशांची मागणी हे हताशपणाचे प्रदर्शन : ढवळीकर

Omkar B

2022 च्या विधानसभेत निवडणूक गोव्यात परत भाजपचे सरकार : आमदार दयानंद सोपटे

Amit Kulkarni

पेडणे पोलिसांनी रिशयन नागरिकाकडून पाच लाख रुपयांचे चरस जप्त

Amit Kulkarni

चोरीप्रकरणातून चौघेही दोषमुक्त

Patil_p

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

Abhijeet Shinde

गो रक्षणार्थ समाजात सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत : सद्गुरु ब्रह्मशानंदाचार्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!