तरुण भारत

इस्तेवान स्झाबो व मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार

20 नोव्हेंबरपासून राज्यात आंचिम : केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्तेवान स्झाबो व मार्टिन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मेस्टिटो (1981), फादर(1966)सारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखल्या जाणाऱया इस्तेवान स्झाबो हे गेल्या काही दशकांमधील सर्वात समीक्षकांनी प्रशंसित केलेले हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे. मार्टिन स्कॉर्सेस हे नवीन हॉलीवूडच्या काळातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असून त्यांना चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शक मानले जाते.

 आंचिमचा पडदा उघडणार द किंग ऑफ ऑल द वर्ल्डने

52व्या आंचिमचा पडदा कार्लोस सौरा दिग्दर्शित ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(EL REY DE TODO EL MUNDO) या चित्रपटाने उघडणार असून हा आंतरराष्ट्रीय प्रीमियर असणार आहे. पहिल्यांदाच आंचिममध्ये नेटफ्लिक्स, ऍमेझोन प्राईम, झी5, वूट, आणि सोनीलीव्ह यासारख्या ओटीटी व्यासपीठांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सदर व्यासपीठ मास्टरक्लास, प्रदर्शन, फिल्म पॅकेज स्क्रीनिंग्ज, व इतर ऑनलाईन कार्यक्रमातून सहभागी होतील. ओटीटी व्यासपीठावर चित्रपट पाहण्याचा कल वाढत असल्याने आंचिम नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहे आणि उद्योग कलाकारांना ओटीटी व्यासपीठाद्वारे जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

 ओटीटी व्यासपीठावर मास्टरक्लासची असणार पर्वणी

 नेटफ्लिक्सतर्फे पॅरिसस्थित इमेज ऍण्ड आर्ट्स, गोबेलिन्स स्कूल एल इमेजद्वारे तीन दिवशीय व्हर्च्युअल मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. जेन कॅम्पियन दिग्दर्शित ‘ द पॉवर ऑफ द डॉग’चा इंडियन प्रीमियर महोत्सवात होणार आहे.  तसेच  ‘धमाका’ चित्रपटाचा विशेष प्रीमियर आयोजित करण्यात आहे आणि याशिवाय रवीना टंडन आणि आशुतोष राणा अभिनीत आगामी क्राईम थ्रीलर मालिकेतील अरण्यकचा पहिला भाग यात दाखविण्यात येणार आहे. सोनीलिव्हवर स्कॅम1992चे पटकथा लेखक सुमित पुरोहित आणि सौरव डे यांचा मास्टरक्लास होणार आहे. हा मास्टरक्लास इंद्रनील चक्रवर्ती मॉडरेट करणार आहेत. झी5वर क्युरेटेड ब्रेकपॉईंट ही नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर यांची लोकप्रिय मालिका पेस आणि भूपती दाखविण्यात येणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

 नवोदित प्रतिभेसाठी 75 क्रिएटिव्ह माईंडस् ऑफ टुमारो’ स्पर्धा

देशातील तरुण नवोदित प्रतिभेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि चित्रपट निर्माते आणि उद्योगाशी जोडण्याकरिता आंचिममध्ये एक व्यासपीठ प्रदान करण्यात येणार आहे. 35 वर्षाखालील 75 सर्जनशीलांना चित्रपट उद्योगाच्या नेत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि महोत्सवात मास्टरक्लासला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. देशभरातील तरूण चित्रपट निर्मात्यांच्या स्पर्धेद्वारे या तरुणांची निवड केली जाईल. तरूण चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि इतरांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कार्यक्रमात त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर असून 75 क्रिएटिव्ह माईंडस् ऑफ टुमारो’ या स्पर्धेसाठी चित्रपट सादर करताना ‘सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. www.dff.gov.in. किंवा www.iffi.org या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.

 ब्रिक्स चित्रपट महोत्सव

पहिल्यांदाच आंचिममध्ये ब्रिक्सच्या ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत या पाच देशांतील चित्रपट ब्रिक्स चित्रपट महोत्सवाद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे. जेन कॅम्पियन दिग्दर्शित द पॉवर ऑफ द डॉग हा चित्रपट मीड फेस्ट फिल्ममध्ये असेल. कॅलिडोस्कोप आणि जागतिक पॅनोरमा विभागात आंतरराष्ट्रीय महोत्सवामधील प्रमुख असे सुमारे 30 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या आंचिममध्ये दिलीप कुमार, सुमित्रा भावे, बुद्धादेब दासगुप्ता, संचारी विजय, सुरेखा सिक्री, जीन पॉल बेलमोंडो, बर्टंड टेवेनिअर, ख्रिस्तोफर प्लमर आणि जीन क्लॉड कॅरीअर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रिट्रोस्पेकिटिव्ह विभागात हंगेरियन फिल्ममेकर बेला टार यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्यांच्या चित्रपटांनी बर्लिन, कान्स आणि लोर्कानो चित्रपट महोत्सवात प्रशंसा मिळविली आहे. या चित्रपट निर्मात्याने आपली स्वतंत्र दृश्य शैली तयार केली आहे. याशिवाय रशियन फिल्ममेकर आणि स्टेज दिग्दर्शक आंद्रेई कोन्चालोव्हस्की यांचेही चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते रजनीकांत यांचेही चित्रपट दाखविले जातील. या महोत्सवात काल्पनिक ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बाँडचे मोठया पडद्यावर चित्रण करणारे पहिले अभिनेते सर सीन कॉनरी यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी इराण फिल्ममेकर राखनबानीतेमाद, यूके चित्रपट निर्माता स्टीफन वुली,  कोलंबिया चित्रपट निर्माता, दिग्दर्शक सिरो गुएरा, श्रीलंका चित्रपट निर्माता विमुक्तीजयसुंदरा, भारतीय चित्रपट निर्माता निला माधव पांडा यांची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

गोव्यात देशी पर्यटन शक्य

tarunbharat

राज्यात 8 जणांच्या कोविड मृत्यूस मुख्यमंत्रीच जबाबदार- संजय बर्डे

Patil_p

संघटितपणे कार्य केल्यास साखळी जिंकणे सोपे

Amit Kulkarni

प्रभू चेंबर्समधील एकच फ्लॅट दोघांना विकला

Amit Kulkarni

कासावलीच्या रेमेद सायबिणीचे उद्या फेस्त

Patil_p

दिल्ली-मडगाव रेल्वे 15 पासून धावणार

Omkar B
error: Content is protected !!