तरुण भारत

गोवा फॉरवर्डचे लवकरच तृणमूलमध्ये विसर्जन

राज्य कार्यकारिणीची आज मडगावात महत्त्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज मडगावात होत आहे आणि या बैठकीत पक्षाचे तृणमूल काँग्रेस पक्षात विसर्जन करण्याचा निर्णय होईल. त्याचबरोबर पक्षाच्या ‘गोय गोंयकार, गोंयकारपण’ हे ब्रिदवाक्य गोव्यात तृणमूलला भाग पाडण्यावरही शिक्कामोर्तब होईल.

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आता नारळ, नुस्ते आणि त्याचबरोबर ‘रसगुल्ले’चा स्वादही घेण्याचे ठरविले आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे धोरण ठरविणाऱया आयपॅक संस्थेचे चेअरमन प्रशांत किशोर यांच्याशी बोलणी करून तृणमूल पक्षाबरोबर युती न करता थेट पक्षात प्रवेश करण्यावर एकमत झाले. त्यानंतर गोवा फॉरवर्डच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीतही तिन्ही आमदारांनी तृणमूल पक्षात जायचे हा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रशांत किशोर यांच्याबरोबर त्यांची पुन्हा एकदा बैठक झाली आणि निवडणुकीला कसे सामोरे जायचे या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

 ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात

तृणमूल हा गोव्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे. जनतेला विश्वासात घेऊन गोव्यात आपले जाळे पसरविण्याच्या उद्देशाने पं. बंगालच्या मुख्यमंत्री व पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दि. 28 रोजी गोव्यात येतील व त्याचवेळी गोवा फॉरवर्डचे तृणमूल पक्षात विसर्जन केले जाईल. मडगाव येथे होणाऱया एका मार्गावरील कार्यक्रमात ममता बॅनर्जी या आमदार विजय सरदेसाई तसेच आमदार जयेश साळगावकर आणि आमदार विनोद पालयेकर हे तिन्ही आमदारांच्या हातात तृणमूलचा झेंडा देऊन त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करतील.

गोवा फॉरवर्डच्या राज्य कार्यकारिणीच्या आज होणाऱया महत्त्वपूर्ण बैठकीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तथापि, हे आमदार व त्या पक्षाचे इतर पदाधिकारी दि. 28 रोजी तृणमूलमध्ये प्रवेश करतील आणि पक्षाचे विसर्जन होऊ न देता कोणीतरी तो पक्ष जिवंत ठेवणार आहे.

आमदारांना राजीनाम्याची गरज नाही, निवडणुकीविना विधानसभेत तृणमूलचा प्रवेश ?

दरम्यान, गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांना दुसऱया पक्षात प्रवेश करण्यासाठी राजीनामा देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे गोव्याच्या इतिहासात प्रथमच एखादा पक्ष गोव्यात येऊन 1 महिना झालेला नसताना त्या पक्षाकडे तीन आमदार राहतील. काँग्रेस पक्षानंतर गोवा राज्य विधानसभेत निवडणुकीपूर्वीच तीन आमदार झाले. मगोकडे सध्या एकमेव आमदार आहे. परंतु तृणमूल कोणतीही निवडणूक न लढविता 3 आमदार घेऊन हा पक्ष आपले अस्तित्व दाखविणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

Related Stories

200 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

Patil_p

राणे जोडीची हुकुमशाही संपविणे काळाची गरज

Omkar B

आमदार एलिना साल्ढाना यांना पोर्तुगीज संबोधून अपमानास्पद वागणुक दिल्याचा वास्कोत निषेध

Patil_p

कोरोना : दोघांचा मृत्यू, 70 नवे रुग्ण

Patil_p

कै. अर्जुन शिरोडकर स्मरणार्थ उद्या गुरुवारी कळंगूट येथे स्वरसंध्या कार्यक्रम

Amit Kulkarni

बेतोडा येथे वीज खांबामुळे वाहतुकीला धोका

Omkar B
error: Content is protected !!