तरुण भारत

लुईझिन फालेरो तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

प्रतिनिधी /पणजी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्षा तथा पं.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 28 रोजी गोव्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनीच लुईझिन फालेरो यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. फालेरो हे सुमारे 40 वर्षे काँग्रेस पक्षात होते. दोनवेळा ते मुख्यमंत्रीपदी होते. तसेच विरोधी पक्ष नेतेपद आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदही भूषविले होते. काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे पूर्वोत्तर राज्यांचाही कारभार सोपविला होता. तसेच तीन राज्यातील निवडणुकीत फालेरो यांनी काँग्रेसच्या निरीक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळलेली आहे. अलीकडेच त्यांनी आमदारकीच्या व काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Advertisements

Related Stories

योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे काणकोणात काँग्रेसकडून दहन

Patil_p

विठ्ठलापूर साखळीतील अपघातात विर्डीतील तरुण ठार

Patil_p

हडफडे सरपंचपदी राजेश मोरजकर बिनविरोध

Omkar B

अखेर 40 खलाशांचे मायभूमीत आगमन

Omkar B

पाच पालिकांचा आज निकाल

Amit Kulkarni

‘स्वयंपूर्ण’ चा प्रचारकच ‘परावलंबी’

Amit Kulkarni
error: Content is protected !!