तरुण भारत

धारवाड रोड उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरवस्था

उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे, वाहनधारकांना धोका : रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

रेल्वे फाटकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. धारवाड रोड येथील उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर देखरेखीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वेमार्ग असल्याने रेल्वेफाटकांवर वाहनांची गर्दी होत आहे. तसेच रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध ठिकाणी असलेल्या रेल्वेफाटकांवर उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. कपिलेश्वर रोड, जुना धारवाड रोड तसेच ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हटवून गोवावेस येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या तिन्ही ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

रेल्वेमार्गादरम्यान येणाऱया पुलांची देखभाल रेल्वे खात्याकडून करण्यात येते. तर उर्वरित दोन्ही बाजूच्या पुलांची देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थेकडून करण्यात येते. पण या पुलांच्या देखभालीकडे मनपासह रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही उड्डाणपुलांवरती कचरा साचत असून स्वच्छतेकडे मनपाने कानाडोळा केला आहे. तसेच पथदीप बंद असून पथदिपांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी पुलांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुलांवरील पथदिपांची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने केली जाते. पण दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच धारवाड रोड उड्डाणपुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. पावसाचे पाणी वाहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने ठिकठिकाणी रस्ता वाहून गेला असून चरी निर्माण झाल्या आहेत. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलाची उभारणी करून चार वर्षे उलटली. पण रस्त्याचे पुनर्रडांबरीकरण झाले नाही. त्यामुळेच रस्ता खराब झाला असून वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. पथदीप बंद असल्याने पुलावर अंधार पसरलेला असतो. अशातच रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील उड्डाणपुलांवर निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

सोनपावलांनी होणार गौरीचे आगमन

Patil_p

मंदिरे नसलेल्यांना फक्त मंडप उभारण्याची परवानगी

Rohan_P

न्यायालयात आता अधिक दक्षता

Patil_p

पिरेगाळी मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

Amit Kulkarni

शिवरायांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने जीवनात वाटचाल करावी

Amit Kulkarni

जंगलाच्या हक्काची लढाई म्हणजे नव्या स्वातंत्र्याची लढाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!