तरुण भारत

शहापूर विभागातून मोठय़ा संख्येने सहभागी होणार

शहापूर विभाग समितीचा बैठकीत निर्धार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डांबला गेला. तेक्हापासून आजतागायत येथील मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असतानाही त्यांना भाषिक अधिकारांपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे 25 रोजी होणारा महामोर्चा व 1 नोव्हेंबर रोजी होणाऱया सायकल फेरीमध्ये शहापूर विभागातून मोठय़ा संख्येने मराठी भाषिक सहभागी होतील, असा निर्धार शहापूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.

शहापूर विभाग समितीची बैठक गुरुवारी गोवावेस रामलिंगवाडी येथील सिद्धीविनायक मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ये÷ कार्यकर्ते शिवाजी हावळाण्णाचे होते. महामोर्चा व सायकलफेरीसाठी विभागवार जागृती केली जात आहे. शहापूरमध्ये प्रत्येक गल्लीत प्रचार केला जाणार असल्याचे हावळाण्णाचे यांनी सांगितले.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे उप शहरप्रमुख राजकुमार बोकडे, माजी महापौर महेश नाईक, सागर पाटील, सुनील बोकडे, मदन बामणे, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, सुधीर नेसरीकर, गजानन शहापूरकर, शिवाजी मजुकर, किरण पाटील, गोपी पाटील, भरमा जांगळे, प्रभाकर पाटील, शशिकांत परीट, बाळकृष्ण झेंडे, दीपक तुळसकर, चंद्रकांत मजुकर, रणजित हावळाण्णाचे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

मारहाण करणाऱया त्या पोलिसांवर कारवाई करा

Patil_p

कंग्राळी खुर्द मसणाई देवीची यात्रा साधेपणाने साजरी

Patil_p

मुख्यमंत्री उद्या बेळगाव दौऱयावर

Amit Kulkarni

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर दारू – चिकन दुकानदारांचा कचरा

Patil_p

बुधवारी जिल्हय़ात 78,732 कामगारांना काम

Amit Kulkarni

पोस्टमन चौकात जीवघेणे खड्डे

Amit Kulkarni
error: Content is protected !!