तरुण भारत

मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार

येळळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी /येळ्ळूर

Advertisements

सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू करण्यात आली आहे. केवळ कन्नडमध्ये फलक लावून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेसमोर बेकायदेशीर लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज उभारण्यात आला आहे. तो हटविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने 25 ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार येळ्ळूरवासीयांनी केला आहे.

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते. 25 रोजी सकाळी 9 वाजता शांताराम कुगजी यांच्या अड्डा येथे सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन असून त्या दिवशी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मूकसायकल फेरीतही मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीला ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सेपेटरी शिवाजी कदम, उपाध्यक्ष राजू पावले, प्रकाश पाटील, विलास घाडी, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, सुवर्णा बिजगरकर, उदय जाधव, वाय. सी. इंगळे, भूजंग पाटील, श्रीकांत येळ्ळूरकर, बाळू पाटील, ओंकार कुगजी यांच्यासह नागरिक व म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका समितीची आज बैठक

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दि. 23 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11ः30 वाजता जत्तीमठ येथे होणार आहे. 1 नोव्हेंबर सायकलफेरी तसेच 25 रोजी होणाऱया महामोर्चा संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका समितीचे अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, पिराजी मुचंडीकर, यल्लाप्पा बेळगावकर, अशोक पाटील, सरचिटणीस मनोज पावशे, पौर्णिमा पाटील यांनी केले आहे.

Related Stories

येळ्ळूर परिसरात बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण-वितरण

Amit Kulkarni

जिल्हय़ातील पर्यटनस्थळांवर विकेंड दिवशी पर्यटकांना बंदी

Omkar B

तुरमुरी-कोनेवाडी रस्त्यावरील श्रमदानातून बुजविले खड्डे

Omkar B

ऑनलाईन क्रिकेट बेटिंगप्रकरणी विनायकनगर येथे युवकाला अटक

Omkar B

अनगोळमधील अनधिकृत लेआऊट हटविले

Patil_p

मराठा मंडळ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल जाहीर

Patil_p
error: Content is protected !!