तरुण भारत

बाधित वाढ मंदावली

अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 23 ऑक्टोबर 2021, सकाळी 10.30

● शुक्रवारी रात्री अहवालात 77 बाधित
● जनजीवन होतेय पूर्ववत
● आता बाजार सुरू होणार केव्हा?
● चित्रपटगृह, नाट्यगृहात अद्यापही प्रयोग नाहीच
● कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य
● बहुतांशी सर्वच तालुक्यात कोरोना बाधित वाढ रोखण्यात यश

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा वेग मंदावला आहे. पन्नासच्या खाली बाधित आढळून येत असून, अजून आकडा हा शून्यावर कसा येईल यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. लसीकरण गावोगावी प्रत्येकाला दिले जात आहे. ज्याला लसीकरण केंद्रावर येता येत नाही. त्याच्या घरी जाऊन ही टुचुक करण्याचा सर्व्हे करण्यात आलेला आहे. अनलॉकमुळे आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. सर्वच तालुके आता सावरू लागले आहेत. नाट्यगृह, चित्रपटगृह सूरु करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप कोणताही प्रयोग झालेला नाही.

बाधित वाढ पन्नाशीच्या आत

कोरोनाचे हे महायुद्ध सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चांगलं लढले. जिल्ह्यात कोरोनाच्या रेल्वेला पटरीवरून उतरवण्यासाठी सुरुवातीपासून आटोकाट प्रयत्न केले. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी अतिशय चांगले काम केले. तसेच विध्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांचे ही चांगले काम सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बाधितांचा वेग आता मंदाऊ लागला आहे. कोरोनाची जाळ्यात अकडलेल्या सातारा जिल्हावासियांची सुखरूप सुटका आरोग्य यंत्रणेने केली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बाधित होण्याचा वेग मंदावला आहे. नव्याने 77 बाधित आढळून आले आहेत.

महाविद्यालयात लसीकरण

शाळा सुरू झाल्या. त्या पाठोपाठ महाविद्यालयात गजबज सुरू झाली. महाविद्यालये कोरोनाच्या काळात कोरोना सेंटर म्हणून उपयोगात आणली जात होती. तीच महाविद्यालये आता गजबजलेल्या अवस्थेत दिसत आहेत. प्रत्यक्ष ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी आपल्या मित्र मैत्रिणीना भेटण्यासाठी, कॉलेजच्या त्या आवारात अभ्यास, गप्पामध्ये रंगण्यासाठी कॉलेजला आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र, कॉलेज प्रशासनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांना लस घेतली आहे का?, विचारणा करून प्रवेश दिला जात आहे. ज्याने लस घेतली नसेल त्यास टुचुक लगेच कॉलेजच्या आवारात केले जात आहे.

नाटकाचा प्रयोग केव्हा?…पहिला शो कोणता असणार?

जिल्हा प्रशासनाने अनलॉकअंतर्गत जिल्ह्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, गतवर्षी सातारा येथील शाहू कला मंदिरात दुसऱ्या लाटेपूर्वी अन लॉक झाले होते, तेव्हा प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे एका लग्नाची दुसरी गोष्ट हा प्रयोग झाला होता. त्यानंतर एक दोन जादूच्या प्रयोग झाले होते. त्यानंतर पुन्हा पडदा बंद झाला होता. चित्रपटगृह ही नवीन सिनेमे नसल्याने सुरू झाले नव्हते. आता ही जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली तरीही अजून चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच आहेत. पहिला शो कोणता होणार याकडे लक्ष लागू राहिले आहे.

77 जणांचा अहवाल बाधित

शुक्रवारी रात्रीच्या 12 वाजताच्या अहवालानुसार तपासण्या 3686 झाल्या असून, 77 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 2.09 पॉझिटिव्हिटी आहे. आतापर्यंत एकूण नमुने 22,04,646 तपासणी करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण बाधित 2,50,829 तर कोरोनामुक्त 2,42,906 आतापर्यंत झाले आहेत. आतापर्यंत 6,408 मृत्यू झाला असून उपचारार्थ रुग्ण 769 एवढे आहेत.

शनिवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,04,646
एकूण बाधित 2,50,829
कोरोनामुक्त 2,42,906
मृत्यू 6,408
उपचारार्थ रुग्ण 769

Related Stories

डिसेंबर महिन्यात ग्रामीण भाग कोरोनामुक्तीकडे

datta jadhav

सातारा शहर पोलीस ठाण्याचा कारभारी बदलला

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीरमधील रस्त्याला माणमधील शहीद जवानाचे नाव

datta jadhav

अनावळेवाडी शाळेतील साहित्य चोरीला

datta jadhav

सातारा : मृत महिलेसह जिल्ह्यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सदाशिवगडावर घुमला वृक्ष संवर्धनाचा नारा

Patil_p
error: Content is protected !!