तरुण भारत

फाईल मंजूर करण्यासाठी 300 कोटींची ऑफर; पण…

ऑनलाईन टीम / मुंबई :

आरएसएस आणि अंबानींशी संबंधित व्यक्तींच्या दोन फाईल मंजूर करण्यासाठी तब्बल 300 कोटींची ऑफर दिली होती. पण ती ऑफर मी धुडकावून लावली. माझ्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थन करत भ्रष्टाचारावर तडजोड करण्याची गरज नसल्याचे सांगितल्याचा दावा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

Advertisements

राजस्थानच्या झुंझनूत येथे एका कार्यक्रमात मलिक बोलत होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल असताना माझ्याकडे आरएसएस आणि अंबानींशी संबंधित व्यक्तींच्या दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी आल्या होत्या. त्यासाठी मला प्रत्येकी 150-150 कोटींची ऑफर देण्यात आली होती. यामधील एक फाईल जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची होती. तर दुसरी फाईल पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयाची होती. मात्र, या दोन्ही फाईल्स बेकायदेशीर कामाशी निगडीत असल्याने त्या मंजूर करू नये, असे मला दोन्ही विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले होते. त्यामुळे मी ती ऑफर धुडकावून लावली. त्यावेळी मोदींनीही माझ्या निर्णयाचे समर्थन केले होते. 5 जोडी कुर्ता-पायजमा घेऊन आलो होतो आणि तेच परत घेऊन जाणार आहे, असे मी फाईलधारकांना सांगितले.

Related Stories

दिल्ली अनलॉक : 7 जूनपासून धावणार मेट्रो; सम – विषम योजनेनुसार उघडार मॉल आणि दुकाने

Rohan_P

बेंगळूरमध्ये वाढदिवस कार्यक्रमात स्फोट

Patil_p

समलैंगिक विवाहांना केंद्र सरकारचा विरोध

Patil_p

सर्व भारतीयांना सुरक्षितपणे आणणार!

Amit Kulkarni

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Abhijeet Shinde

9 सप्टेंबर रोजी ब्रिक्सची शिखर परिषद

Patil_p
error: Content is protected !!