तरुण भारत

गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकर कांबळी यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले / वार्ताहर:


गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या कार्यकारिणीची मुदत 31 मार्च 2021 रोजी संपली. परंतु कोव्हीड महामारीमुळे निवडणुका लांबल्याने कार्यकारी मंडळाची निवडणूक ऑगस्ट 2021 ला पार पडली. या नूतन कार्यकारिणीचे अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकरभाई कांबळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नुतन कार्यकारणीत अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर, उपाध्यक्षपदी शंकरभाई कांबळी, खजिनदारपदी प्रमोद कावळे, सचिव पदी उमेश सुकी, सहसचिवपदी मंगेश कांबळी, संचालक म्हणून सुवर्णलता महाले, दिनकर नागवेकर, राजन गावडे, पांडुरंग कौलापुरे, प्रदीप प्रभू, कृष्णा परब, चंद्रशेखर जाधव, सिनेट उपाध्यक्षपदी आमदार दीपक केसरकर, सिनेट सदस्यपदी भाऊ आंदुर्लेकर, रवींद्र धोंड, शिक्षण तज्ञ सिनेट सदस्य व्ही. एन. नाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisements

Related Stories

कोरोनावर चीनचा ‘त्रीसुत्री फॉर्म्युला’!

NIKHIL_N

गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला

Patil_p

‘शिवविवाह’ सोहळय़ात ‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना’ संदेश

Omkar B

जिल्हय़ात कोरोनाचा चौथा बळी

Patil_p

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली

Abhijeet Shinde

कोरोनाशी काळय़ा फितीने आशांची लढाई!

NIKHIL_N
error: Content is protected !!