तरुण भारत

काँग्रेसचा उत्तराखंडातही पंजाब पॅटर्न?

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंजाबनंतर (punjab) आता उत्तराखंडमध्येही (uttarakhand) मुख्यमंत्री (CM) बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. पंजाबच्या धर्तीवरच उत्तराखंडमध्येही दलित मुख्यमंत्री देण्याचे काँग्रेसकडून संकेत मिळत आहेत. काँग्रेसमधील दलित नेते यशपाल आर्य (yashpal arya) यांचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांनी पंजाबचाच फॉर्म्युला उत्तराखंडमध्ये राबविण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्रीपदाची आस लावून असलेले माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं आहे. दलित नेते यशपाल आर्य आणि त्यांच्या मुलाने भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये दलित सीएम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

गांधी कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रावत हे एआयसीसी कार्यालयात पोहोचले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनाही आर्य यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये तीन बैठका झाल्या. त्यानंतर आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला सत्तेत यायचं आहे. त्यामुळेच आर्य यांना पक्षात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीही उत्तराखंडमध्ये प्रवेश करत असून आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisements

Related Stories

भारतीय लष्कराला मिळणार नवे बळ

Amit Kulkarni

फुटबॉलपटू इब्राहिमोव्हिकला कोरोनाची बाधा

Patil_p

भारतात मागील 24 तासात 47,704 नवे कोरोना रुग्ण, 654 मृत्यू

datta jadhav

चीन महापुराच्या विळख्यात

Patil_p

स्मृतीसमोरच मोदी म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी…’

prashant_c

निर्भया गुन्हेगाराचा अर्ज फेटाळला

tarunbharat
error: Content is protected !!