तरुण भारत

बांगलादेशातील हिंदूंविरोधी हिंसेप्रकरणी निदर्शने

150 देशांमधील इस्कॉन सेंटर्समध्ये निदर्शने- प्रार्थनासभांचे आयोजन

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisements

बांगलादेशात मंदिरे आणि हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात शनिवारी 150 देशांमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. ही निदर्शने वेगवेगळय़ा देशांमधील इस्कॉन केंद्रांच्या ठिकाणी झाली असून यादरम्यान प्रार्थना सभांचे आयोजन करत हल्लेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हिंसेदरम्यान बांगलादेशात इस्कॉन मंदिरावर झालेल्या हल्ल्यात एका भाविकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.

मायापूर इस्कॉनचे जागतिक मुख्यालय आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन), कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी बांगलादेशातून येणारी छायाचित्रे जगभरासाठी अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. न्यूयॉर्क, मॉस्को, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडाच्या काही भागांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.  शनिवारी 150 देशांमधील सर्व इस्कॉन मंदिरे आणि अन्य ठिकाणी भाविक बांगलादेशातील घटनेच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचे दास म्हणाले.

या हल्ल्यांबद्दल आम्ही दुःखी आणि दुखावलो गेलो आहोत. आम्ही शांतता आणि बंधुभावाला चालना देतो. जमाव आम्हाला कसे लक्ष्य करू शकतो? आम्ही नेहमीच नोआखलीच्या (बांगलादेशात) लोकांच्या बाजूने राहिलो आहोत. हिंसाचारात छोटय़ा मुलांसमवेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी

बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान पूजा मंडपांची तोडफोड करत हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. याच्या विरोधात इस्कॉनने भारतासह अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. इस्कॉनच्या सदस्यांनी कोलकाता येथे बांगलादेशच्या दूतावासाबाहेरही निदर्शने केली होती. तसेच इस्कॉनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे या हिंसेप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी अटकेत

बांगलादेश हिंसाचाराचा मुख्य आरोपी इक्बाल हुसैनला गुरुवारी रात्री कॉक्स बाजार येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर कोमिल्ला येथील दुर्गा पूजा मंडपात धर्मग्रंथाची प्रत ठेवण्याचा आरोप आहे. हुसैनला कॉक्स बाजार येथून मोठय़ा बंदोबस्तात कोमिल्ला येथे आणले गेले.

Related Stories

तामिळनाडू सरकारमध्ये रघुराम राजन यांना जबाबदारी

Patil_p

अकाली दलाच्या विक्रम मजीठियांसह 9 आमदारांवर गुन्हा

datta jadhav

अशोक लवासांनी सोडले निवडणूक आयुक्तपद

Patil_p

रेल्वे सोडणार ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

Patil_p

पश्चिम बंगाल : कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉकडाऊन

Rohan_P

दिल्लीत 3609 नवे कोरोना रुग्ण; 19 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!