तरुण भारत

सीरियामध्ये अमेरिकेचा एअरस्ट्राइक

अल-कायदाचा दशतवादी ठार ः अमेरिकेच्या चौकीवरील हल्ल्याची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था / दमास्कस

Advertisements

अमेरिकेच्या सैन्याकडून सीरियात करण्यात आलेल्या एअरस्ट्राइकमध्ये अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता अब्दुल हामिद अल मतर मारला गेला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी यांनी याची माहिती दिली आहे. अल-कायदाचा मोठा नेता मारला गेल्यावर जगभरातील हल्ल्यांचा कट रचणे आणि ते घडवून आणण्याची अल-कायदाची क्षमता काहीशी कमी जाणार आहे. अल-कायदा दीर्घकाळापासून आमचे नागरिक, आमचे सहकारी देश आणि निष्पाप लोकांना लक्ष्य करत राहिल्याचे रिग्सबी म्हणाले.

हा एअरस्ट्राइक एमक्यू-9 विमानाच्या मदतीने करण्यात आला होता. यात कुठल्याच नागरिकाला नुकसान पोहोचल्याचे वृत्त नाही. अलकायदा ही दहशतवादी संघटना अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांसाठी धोकादायक आहे. अल-कायदा सीरियाचा एक सुरक्षित ठिकाण म्हणून वापर करत आहे. येथून जगभरात दहशतवादी हल्ले घडविले जातात असे विधान रिग्सबी यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी दक्षिण सीरियात अमेरिकेच्या सुरक्षा चौकीवर हल्ला झाला होता. अमेरिकेने हा एअरस्ट्राइक या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केला का हे मात्र रिग्सबी यांनी सांगणे टाळले आहे. तसेच सीरियातील कुठल्या भागात हा स्ट्राइक करण्यात आला हे देखील त्यांनी सांगितलेले नाही.

सप्टेंबर महिन्यात पेंटागॉनने बंडखोरांच्या ताब्यातील सीरियाच्या उत्तर-पश्चिम भागात एअरस्ट्राइक केला होता. या कारवाईत अल-कायदाचा वरिष्ठ नेता सलीम अबु-अहमद मारला गेला होता. हा एअरस्ट्राइक इदलिबमध्ये झाला होता. या भाग सीरियाच्या बंडखोर गटांच्या ताब्यात आहे. या गटांमध्ये अल-कायदाचा सहकारी गट हयात ताहिर अल-शम सामील आहे.

सीरियात दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे. तेथे विदेशी सैन्य, दहशतवादी, अल-कायदा, इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांनी स्वतःचा तळ निर्माण केला आहे. 2011 पासून आतापर्यंत गृहयुद्धात सुमारे 5 लाख लोक मारले गेले आहेत.

Related Stories

‘कोविशिल्ड’ला दक्षिण आफ्रिकेतही मंजुरी

datta jadhav

आगामी 4 ते 6 महिन्यात कोरोनाचा प्रकोप; परिस्थिती अधिक गंभीर होणार

Rohan_P

भारतातील सद्यस्थिती दुःखद : नडेला

Patil_p

पाकिस्तान : कराचीजवळ प्रवासी विमान कोसळले

datta jadhav

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 8 लाखांवर

datta jadhav

तुर्कीत बाधितांची संख्या 20 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!