तरुण भारत

अमेरिकसोबत 54 टॉरपीडोंसाठी करार

भारतीय नौदलाचे बळ वाढणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलाचे पाणबुडीविरोधी लढाऊ विमान पी-8आयसाठी 423 कोटी रुपये खर्चुन एमके 54 टॉरपीडो आणि चाफ तसेच फ्लेयर्ससारखे एक्सपेंडेशबल खरेदी करण्यासाठी अमेरिकेच्या सरकारसोबत करार केला आहे. या उपकरणांमुळे पी-8आय विमानांच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकूण 11 पी-8आय विमाने असून त्यांची निर्मिती अमेरिकेतील बोइंग या कंपनीने केली आहे. पी-8आय विमानाला त्याच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेसह आधुनिक सागरी टेहळणी क्षमतेसाठी ओळखले जाते.

नव्या खरेदी कराराची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विटरवर दिली आहे. विदेशी सैन्य विक्री (एफएमएस) अंतर्गत अमेरिकेच्या सरकारसोबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ही उपकरणे पी-8आय विमानांशी संबंधित सामग्री असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

Related Stories

उत्तराखंडात 1,391 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

Rohan_P

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारताच्या वाटेवर ?

Patil_p

‘ब्लॅक टॉप’ जवळचा भाग इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी घेतला ताब्यात

datta jadhav

राजकीय ग्रुप्सबाबत फेसबुक अधिक दक्ष

Patil_p

बिहारमध्ये भाजप देणार मोफत कोरोना लस

Patil_p

स्फोट, गोळीबार घटनांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशत

Amit Kulkarni
error: Content is protected !!