तरुण भारत

फैजाबाद रेल्वेस्थानकाला ‘अयोध्या कँट’ नाव

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisements

उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने रामनगरी अयोध्येत आणखी एक काम केले आहे. भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी पायाभरणीचे काम पूर्ण होताच योगी सरकारने फैजाबाद जंक्शन रेल्वेस्थानकाचे नाव बदलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जंक्शन रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या कँट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधीचा आदेशही काढला आहे.

राज्य सरकारने फैजाबाद जंक्शन रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी पाठविला आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर लवकरच अधिकृत बदलाची अधिसूचना काढली जाणार आहे.

फैजाबाद जंक्शन रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याच्या निर्णयाकडे पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात यापूर्वी देखील भारतीय इतिहासातील नामांकित लोकांची नावे रस्ते, रेल्वेस्थानक आणि सार्वजनिक ठिकाणांना दिली आहेत.

योगी सरकारने यापूर्वी 2018 मध्ये फैजाबादचे नाव अयोध्या जिल्हाकरण्याची घोषणा केली होती. 6 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने फैजाबाद जिल्हय़ाचे नाव बदलून अयोध्या करणे आणि जिल्हय़ाचे प्रशासकीय मुख्यालय अयोध्या शहरात हलविण्यास मंजुरी दिली होती.

Related Stories

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

रोजगारनिर्मितीस चालना : 2.65 लाख कोटीचे

Patil_p

कोरोना मृतांच्या आकडय़ात घट

Patil_p

विद्यार्थी बसपास वितरणाला प्रारंभ

Patil_p

राहुल गांधी म्हणतात, ”स्वतःची काळजी घ्या, कारण सरकार देश विक्रीत व्यस्त”

Abhijeet Shinde

‘एजीआर’ पेमेन्टसाठी कालावधी वाढण्याची शक्यता?

Patil_p
error: Content is protected !!