तरुण भारत

दिग्दर्शकाशीच सलमाने केले होते भांडण

इटर्नल्स चित्रपटाचा दिग्दर्शक अन् अभिनेत्री

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायेम स्वतःच्या पहिल्या सुपरहिरो भूमिकेत दिसून येण्यास सज्ज आहे. मार्व्हलचा चित्रपट इटर्नल्समध्ये सलमा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ती अजॅक नावाच्या सुपरहिरोच्या भूमिकेत दिसून येईल. चित्रपटाच्या पटकथेवरून दिग्दर्शक क्लोई झाओसोबत मोठे भांडण झाले होते असे सलमाने एका मुलाखतीत सांगितले आहे.

 क्लोई झाओसोबतचे भांडण माझ्याच घरी झाले होते. हे भांडण ऐकणाऱया लोकांना मला आता चित्रपटातून काढून टाकले जाईल असेच वाटत होते. पटकथेबद्दल माझी काही समस्या होती. यानंतर मी घराबाहेर पडले होते. पण क्लोई यांच्यासाब्sात मी उत्तम सृजनात्मक संभाषण केले होते, हा प्रकार खरोखरच चांगला होता. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होते. आम्ही सुवर्णमध्य शोधला होता असे सलमाने मुलाखतीत सांगितले आहे.

इटर्नल्स चित्रपटाचा जागतिक प्रीमियर अलिकडेच लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. यात सलमा हायेक अत्यंत सुंदर दिसून आली होती. या सोहळय़ात सलमा स्वतःची मुलगी व्हॅलेंटिनासोबत पोहोचली होती. प्रीमियरमध्ये अभिनेता रिचर्ड मॅडेन, अँजेलिना जोली, कुमॅल नन्जियानी, किट हॅरिंग्टन देखील सामील झाला होता.

Advertisements

Related Stories

तिरुपतिमध्ये विवाह करणार जान्हवी

Patil_p

वाघाचा शोध घेणार विद्या बालन

Patil_p

अक्षय कुमार झाला भावूक, टीव्ही अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तरुणांना केले आवाहन

Abhijeet Shinde

“रावरंभा” तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी..

Patil_p

सिद्धार्थ पिठानीला दिलासा नाहीच, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Rohan_P

आलायाला मिळाले सल्ले

tarunbharat
error: Content is protected !!