तरुण भारत

माणसांमध्ये परतला ‘मोगली’

सूट-बूट घालून जाऊ लागला शाळेत

आफ्रिकेतील देश रवांडाच्या जंजमीन एली नावाच्या व्यक्तीची कहाणी चर्चेत आहे. जंजीमनला रियल लाइफ ‘मोगली’ म्हणून संबोधिले जाते. जंजीमन माणसांऐवजी प्राण्यांसोबत राहत होता. दीर्घकाळापर्यंत प्राणी आणि जंगलांमध्ये राहिल्याने त्याच्या सवयी माणसांपेक्षा वेगळय़ा झाल्या होत्या. पण आता हळूहळू जंजीमन अन्य माणसांमध्ये मिसळू लागला आहे. एवढेच नाही तर तो आता शाळेतही जातोय.

Advertisements

जंजीमन एलीचा जन्म 1999 मध्ये झाला होता. जन्मताच तो मायक्रोसेफली आजाराने ग्रस्त झाला. यामुळे त्याचा चेहरा विचित्र झाला आणि डोकं शरीराच्या तुलनेत खूपच छोटे राहिले होते. काहीसा मोठा झाल्यावर जंजीमन अधिकच वेगळा दिसू लागल्याने लोक त्याला चिडवू लागले.

याचदरम्यान जंजीमन घरदार सोडून जंगलात राहू लागला. तो बहुतांश वेळ जंगलातच घालवायचा. कुटुंबीयांनी कितीही प्रयत्न केला तरीही तो पळून जंगलात पोहोचायचा. लहानपणापासूनच त्याला जंगलात प्राण्यांसोबत राहणे आवडायचे. अनेक वर्षांपर्यंत तो जंगलात ‘मोगली’सारखा जगला. लोक त्याला रियल लाइफ मोगली म्हणू लागले.

याचदरम्यान लोकांना जंजीमनविषयी समजल्यावल त्याला परत माणसांमध्ये आणण्याची मोहीम सुरू झाली. अफ्रिमॅक्स टीव्हीने निधी जमविण्यास सुरुवात केली. जगभरातील प्रेक्षकांकडून भरपू देणगी मिळाली. या पैशांच्या मदतीने जंजीमन आणि त्याचे कुटुंब सहजपणे जगू शकतात.

सामान्य जगण्याच्या वाटेवर

जंजीमन एली आता देणगीतून मिळालेल्या पैशांच्या मदतीने सामान्य जीवन जगण्याच्या मार्गावर आहे. त्याला एका विशेष शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. यादरम्यान तो शर्ट-पँट घालू लागला असून त्याने जंगलाच्या ऐवजी स्वतःच्या घरात राहण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी जंजीमनच्या जीवनावर एक माहितीपट तयार करण्यात आला होता.

Related Stories

शाळांमध्ये स्कर्ट घालून येत आहेत शिक्षक

Amit Kulkarni

अंतराळात पोहोचणार नववर्षाची भेटवस्तू

Patil_p

रियल इस्टेट स्टार्टअपची कमालीची आयडिया

Patil_p

चोरीच्या मार्गाने रशियाकडून स्पुतनिक लसीची निर्मिती

Patil_p

अंतराळातून दिसते वाहणारी ‘सोन्याची नदी’

Patil_p

ट्रम्प दौऱयापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले

tarunbharat
error: Content is protected !!