तरुण भारत

श्वानासोबत वधूचा अनोखा फोटोशूट

अमेरिकेतील हाना किमने दीर्घकाळानंतर स्वतःचा प्रियकर जाराड ब्रिकमॅनसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. पण ती स्वतःच्या विवाहस्थळी स्वतःच्या पाळीव श्वानासोबत पोहोचली. तिच्या एंट्रीदरम्यान तिचा श्वान देखील हजर होता.

हाना एकीकडे स्वतःच्या विवाहासाठी सुंदर पांढऱया गाउनमध्ये सजली होती. तर तिचा प्रेमळ गोल्डन रिट्रिवर श्वान देखील विवाहासाठी विशेष सजून आला होता. हाना किमने हातात पुष्पगुच्छ घेत स्वतःच्या श्वानासोबत विवाहासाठी एंट्री केली तेव्हा सर्वजण त्यांना पाहतच राहिले. 

Advertisements

जाराड आणि हानाचा विवाह ओरेगनच्या कॅम्प कोल्टनच्या जंगलांमध्ये आयोजित करण्यात आला होता. हाना आणि तिच्या श्वानासोबतच्या एंट्रीनंतर छायाचित्रकाराने त्यांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमधील क्यूट बाँडिंग कॅमेऱयात कैद झाले.

वेडिंग फोटोशूट करणाऱया छायाचित्रकाराचे नाव स्टेपनी नॅशट्रब आहे. तिने हे आतापर्यंतचे सर्वात क्यूट फोटोशूट असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पेट डॉग गम्बो विवाहाच्या दिनी स्वतःच्या मालकिणीसोबत हे फोटोशूट करवून घेत अत्यंत आनंदी होता असे तिने नमूद केले आहे.

हाना आणि तिच्या प्रियकराची भेट 2014 मध्ये श्वानामुळेच झाली होती. याचमुळे दोघांनीही श्वान आपल्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा असावा असे ठरविले होते. याचमुळे विवाहाच्या प्रत्येक विधीत डॉग ब्रिगेड सामील राहिले.

Related Stories

पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत

prashant_c

हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जोडले अक्षरांशी अक्षय नाते

prashant_c

बास्केटबॉलचे जनक जेम्स नायस्मिथ यांच्या सन्मानार्थ गुगलचे खास डूडल!

Rohan_P

लॉकडॉऊनचे असेही चांगले ‘इफेक्टस्’

Patil_p

हिंदू-मुस्लिम ऐक्याची कमान आणखी सजली…

Abhijeet Shinde

तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यासाठी आणले हेलिकॉप्टर

Patil_p
error: Content is protected !!