तरुण भारत

जगातील सर्वात भीतीदायक जंगल

जंगलात शिरणारा होतो गायब

जगात अशा अनेक भीतीदायक जागा आहेत, जेथे लोक जाण्यास किंवा थांबण्यास घाबरतात. रोमानियच्या होया बस्यू जंगल याचपैकी एक आहे. याला जगातील सर्वात भीतीदायक जंगल म्हटले जाते. या जंगलात शिरणारा कधीच परतत नसल्याचे बोलले जाते.

Advertisements

होया बस्यू जगातील सर्वात भयावह जंगलांपैकी एक मानले जाते. हे जंगल ट्रान्सल्वेनिया प्रांताच्या क्लुज काउंटीत आहे. जंगलात घडणाऱया रहस्यमय घटना पाहता याला ‘ट्रान्सल्वेनियाचे बर्म्युडा ट्रायंगल’ अशी उपमा देण्यात आली आहे.

होया बस्यूला बर्म्युडा ट्रायंगल आणि ट्रान्सल्वेनियाचा त्रिकोण अशी नावेही मिळाली आहेत. या जंगलातील झाडं वाकडी दिसून येतात. उन्हात हे दृश्य अत्यंत भयावह असते.

या ठिकाणाला लोक युएफओ आणि भूत-प्रेतांशीही जोडून पाहतात. या जंगलात एक गुराखी बेपत्ता झाल्यावर याबद्दल लोकांची उत्सुकता वाढली. या जंगलानजीक राहणाऱया लोकांनुसार शेकडो वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या पूर्वजांकडून अशाप्रकारच्या गोष्टी ऐकल्या आहेत.  सर्वप्रथम एक व्यक्ती जंगलात दाखल होताच गायब झाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत 200 गुरे देखील होती. तेव्हापासून जंगलात शिरणारा कधीच परतून येत नसल्याचे बोलले जाते.

Related Stories

केंद्र सरकार रेमडेसिविरचा पुरवठा थांबवणार

Abhijeet Shinde

लोकप्रिय वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन

Abhijeet Shinde

संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी

Patil_p

हिमालयात 20 वर्षांमधील उच्चांकी तापमान

Patil_p

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती बिघडली

Patil_p
error: Content is protected !!