तरुण भारत

इस्कॉन मंदिरावरील हल्ल्या विरोधात निषेध मोर्चा

प्रतिनिधी/ बेळगाव

बांगलादेश येथे काही दिवसांपूर्वी इस्कॉनसह इतर हिंदू मंदिरांवर हल्ला करून भक्तांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा जगभर निषेध करण्यात येत असून, शनिवारी 150 देशांमध्ये निषेध व्यक्त करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) बेळगाव शाखेच्या वतीने भजन किर्तन करत टिळकवाडी परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला.

Advertisements

हरे कृष्ण चा जप करत इस्कॉनच्या भाविकांनी शुक्रवारपेठ टिळकवाडी येथील मंदिरापासून गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानापर्यंत साखळी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी हातामध्ये हिंदू धर्मियांना जगू द्या, हल्ला करणाऱयांवर कारवाई करा, हिंदूंना सुद्धा मानव म्हणून अधिकार द्या, इस्कॉन शांततेचे पुरस्कर्ते आहे असे फलक या आंदोलनावेळी दाखविण्यात आले. या निषेध मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिला, पुरूष, लहान मुले सहभागी झाली होती. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्ती रसामृत महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला.

कोरोनाच्या नियमावलीमुळे भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली नसली तरी आंदोलन करर्त्यांनी गोवावेस येथे आपला निषेध व्यक्त केला. टाळ मृदंगाच्या साथीने हरेकृष्णाचा जप करत हे अनोखे आंदोलन करण्यात आले. वाहतुकीसाठी अडथळा होणार नाही याची खबरदारी या मोर्चा वेळी घेण्यात आली होती.

भक्ती रसामृत महाराज (इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष)

इस्कॉनच्या माध्यमातून जगभर भक्तीचा प्रसार केला जात आहे. परंतु बांगलादेश येथे इस्कॉनसह अन्य हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला. ही कृती निंदनीय असून, अशा व्यक्तींवर वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. या विरोधात जगभर आंदोलन केलेजात असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

Related Stories

कडोली येथे कलमेश्वर देवालयाचा दसरोत्सव उत्साहात

Patil_p

कोगनोळी अंबिका मंदिरात बनशंकरी उत्सव

Omkar B

नागनुरी यांनी नियुक्त केलेले पदाधिकारीच अधिकृत

Patil_p

गोकाक फॉल्ससाठी विशेष बससेवा

Amit Kulkarni

दुचाकी अपघातात महिला ठार

tarunbharat

बेळगाव वन कार्यालयांतील कामे ठप्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!