तरुण भारत

आविष्कार उत्सवाला लक्षणिय प्रतिसाद

प्रतिनिधी/ बेळगाव

आविष्कार उध्यमशिल संस्थेतर्फे आयोजित आविष्कार उत्सवाला बेळगावकरांचा लक्षणिय प्रतिसाद लाभला मराठा मंदिर येथे शनिवारपासून या उत्सवाला सुरूवात झाली. स्थानिक महिला उद्योजिकांना व प्रामुख्याने गृहोद्योग करणाऱया महिलांना प्रोत्साहन मिळावे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतुने हा उत्सव भरविण्यात आला आहे.

Advertisements

या निमित्ताने दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता येणार आहे. सदर उत्सवामध्ये दिवाळीसाठी आवश्यक अशा पणत्या, आकाशदिवे, साजावटीच्या विविध वस्तु, तोरण, विविध प्रकारच्या साडय़ा व डेस मटेरिअल, पर्स, शुद्ध चांदीचे तसेच ऑक्सोडाईड दागिने, पर्स, बॅगा, विविध प्रकारचे सांडगे-पापड, दिवाळीचा फराळ यासह अन्य साहित्य उपलब्ध आहे.

याशिवाय खाद्यपदार्थांचे वेगळे दालन असून येथे खमंग आणि चटपटी असे अनेक खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत. रविवारी सकाळी 11 ते 8 या वेळेत हा उत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. दरम्यान शुक्रवारी उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आविष्कारची वेबसाईटही सुरू करण्यात आली.

Related Stories

गरजा कमी झाल्या तरचं जीवन सुकर

Patil_p

न्यायालय आवारातच व्हिडिओद्वारे पक्षकारांची घेतली साक्ष

Patil_p

मांगूरमधील दोघांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

राज्यस्तरीय शिक्षक संमेलन 22 डिसेंबरला बेळगावात

Amit Kulkarni

इंदुरीकर महाराजांना सायबर सेलकडून दिलासा

tarunbharat

पावसामुळे सोयाबिन पिकाला फटका

Patil_p
error: Content is protected !!