तरुण भारत

धर्मांतर विरोधी नवा कायदा नको

प्रतिनिधी/ बेळगाव

घटनेमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याची तरतूद असताना कर्नाटकात वेगळय़ा कायद्याची गरज नाही, असे स्पष्ट मत बिशप डेरीक फर्नांडीस यांनी व्यक्त केले. शनिवारी सकाळी बिशप हाऊस येथे प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कर्नाटकात हा कायदा लागू झाल्यास धर्मांध शक्तीकडून त्याचा दुरुपयोग होईल व याचा ख्रिस्ती समाजाला त्रास होईल.

Advertisements

प्रलोभन दाखवून अथवा सक्ती करुन कोणाचेच धर्मांतर करणे शक्मय नाही. स्वेच्छेने धर्म बदलणे शक्मय आहे. परंतु त्यासाठी सक्ती करता येत नाही. ख्रिस्ती धर्म कायदा 748/2 नुसार सक्तीने धर्मांतर करणे पाप आहे. अशा धर्मांतराला आमचा विरोध आहे.

सक्तीच्या धर्मांतर विरोधात अनेक कायदे आहेत. तेंव्हा कर्नाटकात नवीन कायद्याची गरज नाही. ख्रिस्ती समाजाकडून शेकडो शाळा चालविल्या जातात. या ठिकाणी आजपर्यंत कोणाचेही धर्मांतर केले नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला संरक्षण द्यावे व धर्मांतर विरोधी कायदा लागू करु नये, अशी मागणी डॉ. डेरीक यांनी केली.

Related Stories

टास्कफोर्स समितीवर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी

Patil_p

बेळगावच्या महिलांचे सौंदर्य स्पर्धेत यश

Omkar B

सुहासिनी महिला मंडळातर्फेनवरात्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

गोडची, वीरभद्र यात्रा साध्या पध्दतीने

Patil_p

पैसे भरूनही वीजपुरवठा नसल्याने शेतकरी आक्रमक

Amit Kulkarni

मटका अड्डय़ांवर छापे,सहा जणांना अटक

Rohan_P
error: Content is protected !!