तरुण भारत

जितो लेडीज विंगतर्फे ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती

प्रतिनिधी/ बेळगाव

जितो लेडीज विंगच्या बेळगाव शाखेतर्फे ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती आणि स्त्राrयांची आरोग्य तपासणी असा कार्यक्रम मजगाव येथील आदिनाथ मंगल कार्यालयात पार पडला. शनिवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात लेडीज विंगच्या अध्यक्षा रुपाली जनाज यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मिलन शहा यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

Advertisements

यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ. अभिनंदन हंजी यांनी महिलांनी कॅन्सर तपासणीसाठी डॉक्टरकडे जायला खाबरु नये, आता नवनवीन उपचार पध्दती उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करुन घेता येतो असे सांगितले. स्त्राrरोगतज्ञ डॉ. सावित्री दोड्डण्णावर यांनी महिलांच्या आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन करुन महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, याची माहिती दिली.

जितो मेन विंगचे उपाध्यक्ष वीरधवल उपाध्ये यांनीही आपले विचार व्यक्त केले. यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह रुमा पाटील यांनी आभार मानले. शिबिराच्या समन्वयक किर्ती दोड्डण्णावर, कार्यक्रम प्रमुख मिलन शहा, मेन विंगचे कार्यवाह अमित दोशी यावेळी उपस्थित होते. रविवारी हलगा येथे हे शिबिर होणार आहे.

Related Stories

रयत गल्लीतील पाणी समस्या सोडविण्यात यश

Amit Kulkarni

कालमणी येथे शेतात आढळले ट्रकभर गोमांस

Patil_p

गोळीबार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळय़ात?

Patil_p

मराठा मंदिरमधील रेडिमेड गारमेंट्सच्या सेलला प्रचंड प्रतिसाद

Amit Kulkarni

जिल्हय़ात 188 कोरोना बाधित

Patil_p

सिद्धेश्वर पालखी महोत्सव भक्तीमय वातावरणात

Patil_p
error: Content is protected !!