तरुण भारत

जिह्यातील केवळ 8 सरकारी कर्मचाऱयांच्या कुटुंबांनाच मदत

अद्याप 31 कुटुंबे वाऱयावर, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान शिक्षक तसेच सरकारी कर्मचाऱयांनी काम केले. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या कुटुंबियांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. जिह्यामध्ये एकूण 39 सरकारी कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील केवळ 8 कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली आहे. अजून 31 जणांच्या कुटुंबियांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रामदुर्ग येथील भालचंद्र जबशेट्टी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठवून ही मागणी केली.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने केवळ निवडणुकीच्या काळातच मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली आहे. वास्तविक 17 एप्रिल रोजी निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांनी अनेकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला त्या सरकारने नुकसान भरपाईबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीही दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा न्याय दिला असताना कर्नाटक राज्यामध्ये का नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. पोटनिवडणुकीमध्ये कोरोना काळात सर्वांनी काम केले. निवडणुकीनंतर त्यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. परंतु या कालावधीतच व मतमोजणीवेळी या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. तेंव्हा या 31 कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जबशेट्टी यांनी केली.

Related Stories

विदेशातील नोकरी सोडून थाटला मत्स्यपालन व्यवसाय

Patil_p

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसबद्दल केले ”हे” वक्तव्य

Abhijeet Shinde

उल्लेखनीय कामकाजासाठी पुणे जिल्ह्यास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पुरस्कार प्रदान

Rohan_P

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

prashant_c

जयशंकर यांची रशियन मंत्र्यांशी चर्चा

Patil_p
error: Content is protected !!