तरुण भारत

‘हिरण्यकेशी’ देणार टनाला 2700 रुपये

चेअरमन निखिल कत्ती यांची माहिती – सहकार महर्षी अप्पणगौडा पाटील यांची पुण्यतिथी

प्रतिनिधी/  संकेश्वर

Advertisements

  ऊसपुरवठा करणाऱया शेतकऱयांना प्रतिटन 2700 रुपये दर देण्यात येणार आहे. तसेच कामगारांना दीपावलीसाठी 8.33 टक्के बोनस दिला जाणार असल्याची घोषणा हिरा शुगरचे चेअरमन निखिल कत्ती यांनी केली. ते शनिवारी सहकार महर्षी अप्पणगौडा पाटील यांच्या पुण्यतिथी समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री उमेश कत्ती तसेच श्री. शिवलिंगेश्वर स्वामीजे होते.

याप्रसंगी निखिल कत्ती यांनी, ऊस उत्पादकांनी उसाचा पुरवठा कारखान्याला करुन दहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रारंभी स्व. अप्पणगौडा पाटील यांच्या स्मारकास्थळी भेट देऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री उमेश कत्ती, चेअरमन निखिल कत्ती, प्रा. बसवराज जगजंपी, संचालक राजेंद्र पाटील, उदयकुमार देसाई, सुरेश बेल्लद आदी मान्यवर उपस्थित होते.

‘हिरा’ लीजवर देणार नाही

हिरण्यकेशी साखर कारखान्याला इतिहास आहे. दि.. अप्पणगौडा पाटील यांनी आपल्या श्रमातून हा कारखाना उभा करुन देशपातळीवर कारखान्याचा नावलौकीक केला आहे. काहींनी विनाकारण कत्ती बंधूंनी सदर कारखाना लीजवर देऊन बंद पाडणार असल्याची अफवा पसरवली आहे. तेंव्हा या अफवेवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी यशस्वी प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात साखरेची टंचाई भासणार असून साखरेला वाढीव दर मिळणार आहे. याचा फायदा निश्चितच शेतकऱयांना होणार आहे. स्व. अप्पणगौडा यांनी तालुक्यात सहकाराचे रोप लावून ते वटवृक्षात रुंपातरीत केले आहे. त्यामुळे सहकार चळवळ अशीच यशस्वीपणे पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. दि. अप्पणगौडा पाटील यांनी शेतकऱयांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, त्यांची मुले शिकावीत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे प्रा. बसवराज जगजंपी यांनी सांगितले.

कारखान्याचे सभासद केंपण्णा देसाई यांचे चिरंजीव प्रफुल देसाई हे जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचा कारखान्यावतीने शाळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक राजेंद्र पाटील, उदयकुमार देसाई, सुरेश बेल्लद, बाबासाहेब आरभोळे, व्यवस्थापक संचालक साताप्पा कर्कीनाईक, जयसिंग सनदी, वीज संघाचे संचालक शशिराज पाटील, माजी नगराध्यक्ष गजानन क्वळ्ळी, श्रीकांत हतनूरे, जयगौडा पाटील, परगौडा पाटील, मारुती अष्टगी, एपीएमसी अध्यक्ष विजय शेरेकर, प्रशांत पाटील, संगमचे उपाध्यक्ष शंकरराव भांदुर्गे, संकेश्वर नगर परिषदेचे सभापती सुनील पार्वतराव, रमेश कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी,  सभासद उपस्थित होते.

Related Stories

‘ओन्ली वॉकिंग, नो व्हेईकल’

Amit Kulkarni

नंदगड बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी

Amit Kulkarni

उषःकाल मंडळातर्फे यल्लाप्पा पाटील यांचा सत्कार

Omkar B

पत्र्याचे शेड कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

मारहाण प्रकरणी तिघा जणांना अटक

Patil_p

दुसऱया दिवशी प्रवाशांचा अल्पप्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!