तरुण भारत

हत्ती नाहीसे झाल्यास निसर्गचक्र कोलमडेल

हत्तीतज्ञ आनंद शिंदे यांचे मत

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

निसर्ग चक्राचे संरक्षण करण्यासाठी आशियाई हत्तींचे संवर्धन, संरक्षण गरजेचे आहे. हत्तीच्या एका वेळच्या शेणामध्ये 17 हजार किडे असतात. या शेणातील ओलावा बीया रूजण्यासाठी उपयुक्त ठरतो. पृथ्वीवरील हत्ती नाहीसे झाले तर उंदीर, बकरीएवढा होऊन निसर्गचक्र कोलमडेल अशी भिती ‘ट्रंक कॉल’ संस्थेचे संस्थापक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.

मंथनतर्फे ‘एक संवांद हत्तीशी’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. ते म्हणाले त्रिशूल फेस्टीव्हलमध्ये आपण हत्तींचे विश्व पाहिले. हत्तीचे खायचे व दाखवायचे दात वेगळे असतात. हत्तीना न मारता शिकवता येते. हे प्रथम माहुतांना पटवून द्यावे लागले. कळपापासून हत्ती वेगळे झाले तर त्यांची जगण्याची शक्मयता 50 टक्क्मयाने कमी होते. अशी माहिती त्यांनी दिली.

आफ्रिका आणि अशिया खंडात हत्ती अधिक आहेत. ते पाहण्यासाठी येणाऱया परदेशी नागरिकांसमोर आपण हत्तींना मारून आपलीच बदनामी करून घेतो व त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हत्तींना लाजणे, रूसणे, माया करणे, लाडीगोडी लावणे हे सर्व समजते. त्यांना कोणाच्यातरी सहवासात रहायला आवडते. हत्तींच्या मादी कळपाने राहतात. 1984 च्या दुष्काळाचा उल्लेख करून ज्या कळपात वयस्कर मादी होत्या ते कळप दुष्काळात टीकू शकले कारण मादींना कुठे पाणी मिळेल, कुठे खाणे मिळेल याचा अंदाज होता, असेही ते म्हणाले.

हत्तीचे कान अंगाला चिकटलेले असतात तेव्हा हत्ती लक्षपूर्वक बोलणे ऐकत असतो.सोंडेत फुंकर मारली की हत्ती हसतो. हत्तीला आंघोळ आवडते. प्रत्येक हत्तीमध्ये एक बाळ दडलेले असते. असे सांगून हत्तींच्या संरक्षणासाठी आपण मित्र म्हणुन उभे राहिले पाहिजे कारण दोघांनाही परस्परांची गरज असते, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी द. मा. मिरासदार, एन. डी. जोशी, पूजा गावडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुनिता देशपांडे यांनी गणेश वंदना सादर केली. शोभा लोकूर यांनी प्रास्ताविक केले. गीता उंदरे यांनी परीचक करून दिला. प्रभा बोकील यांनी सूत्रसंचालन केले, वैभव लोकूर यांनी तांत्रिक सहाय्य केले. या कार्यक्रमाला मराठी राज्य मराठी विकास संस्थेचे सहाय्य लाभले

Related Stories

वादग्रस्त ऑडिओ व्हायरल करणाऱया युवकाला अटक

Patil_p

‘शांताई’ने उचलली अनाथ मुलांची जबाबदारी

Patil_p

धारदार शस्त्राने महिलेचा खून

Patil_p

हिंडलग्यात रामचंद्र मन्नोळकरांच्या प्रचारार्थ भव्य फेरी

Patil_p

जितोच्या राष्ट्रीय संचालकपदी सतीश मेहता

Omkar B

संत निवृत्तीनाथ सोसायटीचा तिळगूळ समारंभ उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!