तरुण भारत

सदाशिवनगर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

प्रतिनिधी / बेळगाव

सदाशिवनगर येथील समता भगिनी महिला मंडळाच्यावतीने कोजगिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सदाशिवनगरातील ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या.

Advertisements

प्रारंभी उपस्थित महिलांचे मंडळाच्यावतीने हळदी-कुंकु करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर काही महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले. व महिलांसाठी व त्यांच्या व्यक्तिगत उन्नतीसाठीही आपण प्रयत्न करू, असे संबोधन केले.

ग्रामीण भागात जपणाऱया हादगाचे आयोजनही यावेळी केले होते. या हादग्याच्या कार्यक्रमात महिलांनी विविध प्रकारची पारंपरिक गीते म्हटली. यावेळी मीनाताई नाडगौडा, अंजली गाडगीळ, सुमित्रा मुचंडीकर, सीमा अकलेकर, सुजाता अष्टेकर, माधुरी माळी, कोमल हुदलीकर, आदींसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

औद्योगिक कारखाने सुरू पण कच्च्या मालाचे काय?

Amit Kulkarni

कचरा टाकल्याप्रकरणी ट्रक ताब्यात, 15 हजार दंड वसूल

Patil_p

पहिल्या रेल्वेगेटची दुरुस्ती

Amit Kulkarni

सिव्हिलच्या सुरक्षेची जबाबदारी आता पोलिसांवर

Amit Kulkarni

बसमार्गात बदल; प्रवाशांची हेळसांड

Amit Kulkarni

पॅसेंजर रेल्वे आजपासून येणार रुळावर

Amit Kulkarni
error: Content is protected !!