तरुण भारत

राशिभविष्य

रवि. दि. 24 ते 30 ऑक्टोबर 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात धनुराशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील अडचणी कमी करता येतील. हिशोब करण्यात चूक करू नका. मोहाला बळी पडू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. वरिष्ठबरोबर संयमाने बोला. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात झालेला तणाव कमी होईल. विरोधकांना तुमचे मत ऐकावे लागेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. संसारात खर्च वाढेल. इतरांना समजून घ्या. कलाक्षेत्रात संयम ठेवा. स्पर्धेत प्रगती होईल. शेअर्समध्ये घाई नको.

वृषभ

या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. शुक्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मागील थकबाकी लवकर वसूल करा. कर्जाचे काम करून घ्या. नवे काम घेऊन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठच्या विरोधात बोलतांना, मुद्दे मांडताना घाई करू नका. प्रति÷ा सांभाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करू नका. सहनशीलता ठेवा. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कलाक्षेत्रात ओळख होईल. स्पर्धा जिंकणे कठीण आहे.

मिथुन

 या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. भागिदार, गिऱहाईकांना दुखवू नका. खर्च वाढेल. वस्तु सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात सतत कामे करत रहा. गैरव्यवहार टाळा. चुकीचे बोलणे करू नका. आर्थिक क्यवहारात गुंतू नका. नोकरीत बेकायदा कामे केल्यास अडचणी वाढतील. प्रति÷ा सांभाळता येईल. जवळच्या व्यक्तींना कमी लेखू नका. व्यसनाने नुकसान होईल. संसारात जीवनसाथीची मर्जी राखा. स्पर्धेत जिद्दीने यश खेचता येईल.

कर्क

या सप्ताहात धनुराशीत शुक्र, मकर राशीत प्लुटो प्रवेश करीत आहे. धंद्यात मेहनत घ्या. नवे काम मिळवता येईल. जुने येणे वसूल करा.कोर्ट केससंबंधी समस्या रेंगाळत ठेऊ नका. घरासंबंधी समस्या सोडवा. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. वरिष्ठच्या मर्जीनुसार निर्णय  घ्यावा लागेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. संसारातील कामे होतील. शुभ समाचार मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धेत प्रगति होईल.

सिंह

या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. धंद्यात किरकोळ वाद न वाढवता नवे काम घ्या. मोह टाळा. भावनेच्या भरात कोणतेही वचन देऊ नका. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने अडचणी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीवर मात करून पुढे जाता येईल, सर्व सोपे आहे असे समजू नका. विरोधक गुपित काढून घेण्याचा प्रयत्न करतील. नोकरी टिकवा, कामाचा व्याप सहन करावा लागेल. प्रति÷ा सांभाळता येईल. विरुद्धलिंगी क्यक्तीच्या सहवास वाढू देऊ नका. स्पर्धेत पुढे जाल. जिद्द ठेवा अहंकार नको.

कन्या

या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकरेत प्लूटो प्रवेश करीत आहे. शुक्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवा. नवे कंत्राट मिळवा. वसुली करा. नवीन परिचय होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे काम प्रभावी ठरेल. मुद्दे महत्त्वाचे मानले जातील. वरि÷ांच्याकडून सहकार्य मिळेल. मान-सन्मान मिळेल. अधिकारात वाढ होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. बढती मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात नावलौकीक मिळेल. कटकटीची कोर्ट केस रेंगाळत ठेऊ नका. संसारात आनंदाची घटना घडेल. स्पर्धा जिंकाल.

तुळ

या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला संयमाने बोला. प्रवासात घाई करू नका. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामे करा. धंद्यात वाढ करता येईल. हिशोब चुकवू नका. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनतीने यश मिळवावे लागेल. प्रति÷ा, लोकप्रियता मिळवण्यासठी चांगली कामे करा. नोकरीत कामामध्ये चूका करू नका. घरातील कामे होतील. समस्या कमी होतील. पैशाची कमी दूर करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती करण्याची जिद्द ठेवा. ओळखी वाढतील.

वृश्चिक

 या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. शुक्र, गुरु लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर अडचणी येतील. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. धंद्यात चर्चा सफल होईल. कर्जाचे काम गोड बोलून करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक हल्लाबोल करतील. तणाव  वाढेल. प्रवासात धोका पत्करू नका. कटकारस्थाने होतील. नोकरीत वरि÷ांच्या विरोधात जाऊ नका. मेहनत घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल. आप्तेष्टांना मदत करावी लागेल.

धनु

या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. गिऱहाईकाला कमी लेखू नका. गुप्त गोष्टी उघड करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती देता येईल. लोकांच्या मनातील गैरसमज हळुहळू दूर करता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीसमवेत कोणताही व्यवहार करू नका. संसारात क्षुल्लक वाद होईल. अनाठायी पैसा खर्च होईल. क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल. स्पर्धा कठीण वाटेल.

मकर

 या सप्ताहात धनु राशीत शुक्र, तुमच्याच राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. कोर्ट केस संपवण्यात यश मिळेल. ओळखीतून नवे काम  मिळवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लावा. दौऱयात यश मिळेल. लोकसंग्रह वाढेल. व्यसन करू नका. मोह टाळा. संसारातील तणाव कमी होईल. वाटाघाटी संबंधीच्या चर्चा यशस्वी होईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चांगली प्रगती होईल.

कुंभ

या सप्ताहात धनुराशीत शुक्र, मकर राशीत प्लूटो प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. खर्च वाढेल. वादविवाद वाढवू नका. कायद्याच्या चौकटीत राहून बोला. राजकीय, सामाजिक कार्यात अनेकांचे सहकार्य मिळेल. जुना वाद, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न  करा. अतिरेक कुठेही करू नका. थट्टामस्करी जपून करा.  नोकरीत मोठे किचकट काम करावे लागेल. संसारात धावपळ होईल. कठीण कामे प्रथम करा. स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

मीन

या सप्ताहात धनु राशीत शुक्र, मकर राशीत प्लुटो प्रवेश करीत आहे. चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. संयमाने धंद्यात कामे करा. नम्रता ठेवा. कामे मिळवा. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात उतावळेपणाने वागू नका. वरि÷ांच्या  अपरोक्ष कोणताही निर्णय घेऊ नका. आरोप येईल. नोकरी टिकवा. विरोधक वाढतील. इतरांना मदत करण्यात तुमचा वेळ खर्च होईल. घरातील कामे वाढतील. धावपळ होईल. वृद्धांची चिंता वाटेल. कोणतीही स्पर्धा कठीण आहे. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

Related Stories

राशिभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 4 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.15 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 18 डिसेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!