तरुण भारत

मराठा आरक्षणासाठी नववर्षात रणशिंग फुंकणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची समान भुमिका असणे गरजेचे आहे. समाज रस्त्यावर उतरल्यास हा आरक्षणाचा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही. कोरोना संसर्गामुळे समाजाने प्रशासनाला सहकार्य करत नेहमीप्रमाणे संयम दाखविला आहे. आत्ता या लढÎाला पुन्हा गती देणे आवश्यक आहे. यासाठी नववर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या साक्षीने ऐतहासिक दसरा चौकातून मराठा आरक्षण लढÎाचे नव्याने रणशिंग फुकणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली.

Advertisements

अखिल भारतीय मराठा महासंघाने प्रकाशित केलेल्या पुढचं पाऊल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर मुळीक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण लढÎाची घोषणा केली.

मुळीक म्हणाले, राज्य सरकारने राज्य मागास आयोगामार्फत मराठा समाजाचे पुर्नसर्व्हेक्षण करावे. आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे कसे कमी होतील यासाठी प्रयत्न करावेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे तो दिसून येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा रस्त्यावरील लढाईला सुरवात करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा गावोगावी जावून मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून देत लढÎात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. मराठा समाज एकजुटीने रस्त्यावर उतरल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करत नववर्षात रस्त्यावरील लढाईला पुन्हा सुरवात करणार असल्याचे सांगितले.

 

Related Stories

सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येचे त्रिशतक पार

Abhijeet Shinde

बार्शीतील कोरफळेत एकाचा अनैतिक संबंधातून खून

Abhijeet Shinde

पासार्डे येथील प्राथमिक शाळेची भिंत ढासळली

Abhijeet Shinde

सातारच्या वाहतूक निरिक्षकांच्या आईचा खून

Patil_p

सातारा शहरात आढळून आलेल्या ओमिक्रोन बाधित ठणठणीत

Patil_p

कोल्हापूर : धोकादायक डीपी अन्यत्र सुरक्षित स्थळी हलवा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!