तरुण भारत

नेपाळला पावसाचा जोरदार तडाखा, 100 जणांचा मृत्यू

काठमांडू

 शेजारी देश असलेल्या नेपाळला बिगरमोसमी पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे या हिमालयीन देशात पूराचे संकट निर्माण झाले आहे. पुरानंतर अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे आजवर 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या नैसर्गिक संकटात 35 जण बेपत्ता झाले आहेत. शेतपिकांबरोबर मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे. बचाव व मदतकार्यांना गती देण्यात आली आहे. विविध जिल्हय़ातील 4000 हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पूर्वेला प्रांत 1 व पश्चिममध्ये सुदूर व करवाली प्रांतात पावसाने मोठे नुकसान केले आहे. नेपाळमध्ये आलेल्या या पुराचा फटका भारतातील उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. याचमुळे या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली जातेय.

Advertisements

Related Stories

64 वर्षीय दाऊद इब्राहिमचे नवे प्रेमप्रकरण

Patil_p

कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा

datta jadhav

अफगाणिस्तानात सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले, 9 ठार

Amit Kulkarni

इराण विदेशमंत्र्यांचा लवकरच भारत दौरा

Patil_p

पूर्व अफगाणिस्तानमध्ये 10 तालिबान्यांचा खात्मा

datta jadhav

204 दिवसांमध्ये भारतात बळींचा आकडा लाखापार

Patil_p
error: Content is protected !!