तरुण भारत

हवा, पाणीबदलाचा परिणाम होतोय मारक, 44 आरोग्य समस्या

लंडन

 हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यासंबंधीत नवीन समस्या उदभवू लागल्या असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. आरोग्याच्या 44 तक्रारी नव्याने समोर आल्या आहेत. लँसेट या आरोग्यविषयक नियतकालिकात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. उष्णतेमुळे होणारे मृत्यू, संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ व भुकेसारख्या व्याधी दिसून येत आहेत. यातील प्रत्येक आजार हा गंभीरतेकडे झुकतो आहे. हे सर्व वाढत्या तापमानवाढीमुळे होताना दिसत आहे. याचा परिणाम वृद्धांवर व युवकांवर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. 1986 आणि 2005 च्या तुलनेत गेल्या वषी 65 वर्षांच्या 3 अब्जहून अधिक जणांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागला. हवामान बदलाचा परिणाम आता जगभरात अत्यंत तीव्रपणे दिसू लागला आहे. अनेक देशांमध्ये पूर तसेच वणव्यांचे संकट वारंवार दिसून येत आहे. अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये वणव्याने अक्षरक्षः लोकांच्या तोंडाला फेस आणला आहे. तर आशिया तसेच युरोपमध्ये पुराचे तीव्र संकट निर्माण झाल्याचे मागील काही काळात दिसून आले आहे. हवामान बदल रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज भासत आहे.

Advertisements

Related Stories

स्पुतनिक-5 कोरोना लस अन् मद्यपान

Patil_p

नव्या शीतयुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल

Patil_p

स्वतःच्या खेळण्यांपेक्षाही लहान मुलगी

Patil_p

भ्रष्टाचार प्रकरणी चिनी बँकरला मृत्युदंड, घेतली होती 2019 कोटींची लाच

datta jadhav

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

प्रदूषण रोखण्यासाठी मोठय़ा शहरांचा पुढाकार

Patil_p
error: Content is protected !!