तरुण भारत

12 बांगलादेशी घुसखोरांची धरपकड

बीएसएफकडून पश्चिम बंगालमध्ये कारवाई -4 हस्तकही ताब्यात

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisements

दक्षिण बंगाल प्रंटियर अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहिमेच्या दरम्यान 12 बांगलादेशी नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला पकडले आहे. हे सर्वजण उत्तर 24 परगणा जिल्हय़ाच्या क्षेत्रातून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते.

गुप्त माहितीच्या आधारावर सीमा चौकी परगुमटी 118 वाहिनीच्या जवानांनी या भागात पोलिसांसोबत शोधमोहीम राबविली. सीमा सुरक्षा  दलाला पाहून जलील तरफदारच्या घरात लपलेल्या बांगलादेशी नागरिकांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. हे सर्वजण उत्तर गोविंद काठी गावाच्या दिशेने पळू लागले होते. बीएसएफने शोधमोहीम सुरूच ठेवून 12 बांगलादेशी नागरिक आणि 4 भारतीय हस्तकांना पकडले आहे.

बांगलादेशी नागरिक कामाच्या शोधात काही वर्षांपूर्वी भारतात दाखल झाले होते. तसेच ते भारतात विविध ठिकाणी काम करत होते. हे सर्वजण भारतातून बांगलादेश येथे स्वतःच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. याकरता भारतातील त्यांचा हस्तक जाकिर हुसैन तरफदार त्यांची मदत करत होता. पण बीएसएफने या सर्वांची धरपकड केली असून त्यांना हिंगलगंज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Related Stories

दिवसभरात 40 हजारांवर नवे रुग्ण

Patil_p

दिल्ली सरकारनं ऑक्सिजनची गरजेपेक्षा चौपट मागणी केली; सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल

Abhijeet Shinde

पाच ‘कॅप्टन’ समर्थकांना मंत्रिमंडळातून डच्चू

Patil_p

जम्मू-काश्मीरच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये येतेय पाकिस्तानी कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क

datta jadhav

बंगालने नेहमीच देशाला मार्ग दाखविलाय!

Patil_p

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!