तरुण भारत

हल्लेखोरांवर ड्रोनद्वारे नजर

शीख-काश्मिरी पंडितांसह युपी-बिहारमधील कामगारांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

जम्मू काश्मीरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खोऱयातील शीख आणि काश्मिरी पंडितांच्या वसाहतींवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक आणि बिगर काश्मिरी लोकांवर हल्ले झाल्यानंतर अधिकाऱयांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रोनद्वारे हवाई निगराणी व्यतिरिक्त, सीमा सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकडय़ाही सुरक्षेसाठी या भागात तैनात केल्या जातील. सुरक्षेच्या दृष्टीने श्रीनगरमध्ये अतिरिक्त नाके उभारले जाणार असून सुरक्षा बंकरमधून लष्करी जवान संशयितांवर पाळत ठेवणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱयावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱयांसह येथील सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत लष्कर, पोलीस, आयबी, मिलिटरी इंटेलिजन्स, सीआरपीएफ आणि बीएसएफचे अधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय, केंद्रांतर्गत इतर एजन्सीचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. स्थानिक नागरिकांवर हल्ल्याच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असे निर्देश शाह यांनी बैठकीत दिले. याप्रसंगी शाह यांनी बैठकीत काश्मीरमधील वाढता दहशतवाद आणि धर्मांधतेवर सुरक्षा संस्थाकडे विचारणा केली. त्यांनी खोऱयातील चकमकींसह सर्वसामान्य नागरिकांवर सातत्याने होणारे हल्ले आणि सीमापार घुसखोरीच्या मुद्दय़ावरही चर्चा केली.

अल्पसंख्याकांच्या वसाहतींवर विशेष नजर

बैठकीत झालेल्या नियोजनानुसार घाटीतील सर्व संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जाईल. याशिवाय शीख, काश्मिरी पंडित, बकरवाल आणि इतर अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांच्या वसाहतींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल. यासाठी, सध्याच्या व्यवस्थेव्यतिरिक्त, इस्त्रायली तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले काही ड्रोन लवकरच ‘डीआरडीओ’कडून सुरक्षा यंत्रणांना पुरविण्यात येणार आहेत.

50 अतिरिक्त कंपन्यांची तैनाती

काश्मीरमध्ये तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा बंकर युग परतले आहे. श्रीनगरमध्ये 2014 मध्ये हटवण्यात आलेले बंकर पुन्हा एकदा बांधले जात आहेत. याशिवाय, श्रीनगरसह खोऱयातील 8 जिल्हय़ांमध्ये निमलष्करी दलाच्या 50 अतिरिक्त कंपन्या तैनात करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच एनआयएच्या 70 हून अधिक उच्चपदस्थ अधिकाऱयांना काश्मीरमध्ये तळ ठोकण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सीआरपीएफचे आणखी एक विशेष डीजी घाटीत तैनात करण्याची तयारी सुरू आहे.

‘केंद्रशासित’नंतरचा पहिलाच दौरा….

अमित शाह यांच्या या दौऱयाच्या पहिल्या दिवशी सुरक्षा अधिकाऱयांसमवेतची बैठक महत्त्वाची ठरली. आता रविवार 24 ऑक्टोबर रोजी ते एक सभा घेतील. तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चाही करणार आहेत. त्याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवस शाह अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील. जम्मू काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना केल्यानंतर अमित शाह यांचा हा जम्मू काश्मीरचा पहिला दौरा आहे. या दौऱयात त्यांच्यासोबत गृह सचिव ए. के. भल्ला, गृह मंत्रालयाचे इतर वरि÷ अधिकारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी, गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी सहभागी आहेत.

हुतात्मा इन्स्पेक्टरच्या निवासस्थानी भेट

काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर शाह थेट जम्मू-काश्मीर सीआयडीचे हुतात्मा इन्स्पेक्टर परवेझ अहमद दार यांच्या घरी पोहोचले. त्यांनी परवेज यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी हुतात्मा दार यांच्या पत्नीला सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्रही दिले. ‘माझ्यासह संपूर्ण देशाला त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे’, अशी शब्दपुष्पांजली त्यांनी वाहिली.

दौऱयादरम्यान खोऱयात कडक सुरक्षाव्यवस्था

गृहमंत्र्यांच्या दौऱयादरम्यान संपूर्ण काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी सध्या काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक गुप्तचर माहितीवर लक्ष ठेवून आहेत. श्रीनगरमध्ये अतिरिक्त निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफच्या 10 अतिरिक्त कंपन्या आणि बीएसएफच्या 15 अतिरिक्त कंपन्या केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच ड्रोन आणि इंटेलिजन्स कॅमेऱयांद्वारे चोवीस तास पाळत ठेवली जात आहे. सीआरपीएफचे एक पथक दल सरोवर आणि झेलम नदीत गस्त घालत आहे. प्रत्येक रस्ता आणि गल्लीबोळात कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

Related Stories

राज्यात 12 ठिकाणी एसीबीचे छापे

Patil_p

भारतात गेल्या 24 तासात 24,879 नवे कोरोना रुग्ण; 487 मृत्यू

Rohan_P

सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द : सर्वोच्च न्यायालय

Rohan_P

पंजाब काँगेसमध्ये सिद्धूंना वाढता विरोध

Patil_p

कोरोनाविरोधी लढ्यातील सहभागींना मध्यप्रदेशात स्वतंत्र 50 लाखांचे विमा कवच

prashant_c

रेल्वे खासगीकरणासाठी कंपन्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p
error: Content is protected !!