तरुण भारत

अनन्याच्या बँक खात्याचीही चौकशी

चौकशीला उशीरा पोहचल्याने वानखेडे संतापले

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisements

कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरु असलेल्या अनन्या पांडेच्या बँक खात्यात अवैध रक्कम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्याकडे अवैध संपत्ती असावी, असा एनसीबीला संशय आहे. त्यामुळे तिच्या बँक खात्यावरही एनसीबीची करडी नजर पडली आहे. तसेच तिच्या वापरातील सात इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. तर शनिवारी चौकशीत तिने आर्यनला गांजा मिळवून दिल्याची कबुली दिल्याने आर्यनच्या अडचणी वाढणार आहेत.

दरम्यान, शनिवारीही तिला चौकशीसाठी एनसीबीने पाचारण केले होते. तथापि चौकशीसाठी ती उशीरा पोहोचल्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तिला चांगलेच झापल्याचे समोर आले आहे. त्यांनी तिला चौकशीस बोलावल्यानंतर वेळेत उपस्थित राहण्याबद्दल कडक शब्दात बजावले असल्याचे सांगण्यात आले.

आर्यनच्या चॅटमधून अनन्या पांडेचे नाव आल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तिची चौकशी सुरु आहे. शनिवारीही तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली आहे. अनन्याने चौकशीदरम्यान मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनन्याने आपण आर्यनला गांजा मिळवून दिला असल्याची कबुली दिली आहे. एका बडय़ा व्यक्तीकडून तो मिळवला व त्याच्या घरातील एका कर्मचाऱयाच्या माध्यमातून तो आर्यनपर्यंत पोहोचवल्याचे तिने म्हटले आहे.

अनन्याला शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुन्हा बोलावण्यात आले होते. तथापि तीन तास उशीरा आल्याने चौकशी अधिकारी समीर वानखेडे संतापले. त्यांनी अनन्याला चांगलेच झापल्याचे वृत्त आहे. ‘हे तुझे प्रॉडक्शन हाऊस नाही. पेंद्रीय तपास संस्थेचे कार्यालय आहे. यापुढे चौकशीला बोलावल्यास वेळेवर हजर राहावे लागेल’, अशा कडक सूचना वानखेडेंनी केल्याचे सुत्रांकडून समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात अनन्या आरोपी नाही, केवळ साक्ष नोंदवण्यासाठी तिला बोलावण्यात आले होते. मात्र अधिकाऱयांनी अनन्याचा मोबाईल व लॅपटॉपसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस ताब्यात घेतली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. यातून एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचे आहेत, जर ती हटवली असतील तर एनसीबी हे चॅट्स रिट्रीव करेल. सोमवारपर्यंत हा डाटा रिट्रीव झाल्यास अनन्या पांडेची त्या आधारावर चौकशी केली जाईल, असे या सुत्रांनी सांगितले.

Related Stories

दिलासादायक! देशात मागील 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांखाली

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटनेत 15 जण ठार

Patil_p

आसामच्या मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा

Patil_p

दिल्ली : आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा; जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट

Rohan_P

देशात ‘डेल्टा प्लस’चे 40 रुग्ण

datta jadhav

अयोध्या : राममंदिरासाठी 2 हजार कोटींचे दान

datta jadhav
error: Content is protected !!