तरुण भारत

लसीकरण मोहिमेबाबत लसनिर्माते समाधानी

आढावा बैठकीत पंतप्रधानांचे केले कौतुक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱया कंपन्यांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी लसनिर्मिती आणि पुरवठय़ाबाबत सर्व वैद्यकीय कंपन्यांचे आणि कर्मचाऱयांचे आभार मानले. तसेच कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. या बैठकीला सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांच्यासह इतर 7 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम चालविल्यामुळे भारतात 100 कोटी डोसचे लक्ष्य निर्धारित वेळेआधी पूर्ण केल्याचे कौतुकोद्गार आदर पूनावाला यांचे वडील सायरस पूनावाला यांनी काढले.

देशात 100 कोटी लसीचे डोस सादर केल्यानंतर पंतप्रधानांनी लस उत्पादकांकडून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. यासोबतच लस संशोधनात प्रगती करण्याबाबतही पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तसेच लसीकरणाला गती देण्याबाबत आणि गरीब देशांना लसपुरवठा करण्याबाबतही पंतप्रधानांनी निर्मार्त्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधींनीही आतापर्यंत झालेले उत्पादन आणि नजिकच्या दोन-तीन महिन्यात होणारा संभाव्य लसपुरवठा याची माहितीही सादर केली. गुरुवारी देशात लसीच्या 100 कोटी डोसचा आकडा पार झाला. यानंतर अनेक कार्यक्रम आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधानांनी रविवारी औषध निर्मात्या कंपन्यांशी थेट संवाद साधला.

Related Stories

बिहारमध्ये पुन्हा येणार रालोआचे सरकार!

Patil_p

आरबीआयच्या बैठकीकडे देशवासियांचे लक्ष

Patil_p

आता बांबू आपल्या ताटात

Patil_p

आगामी शैक्षणिक वर्षात शाळा दोन सत्रात

Patil_p

आयएनएस विक्रमादित्यवर तेजस विमानाचे अरेस्टेड लँडिंग

Patil_p

देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश?

datta jadhav
error: Content is protected !!