तरुण भारत

मेक्सिकोतील गोळीबारात भारतीय तरुणीचा मृत्यू

मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था

मेक्सिकोमध्ये झालेल्या एका गोळीबाराच्या घटनेत हिमाचल प्रदेशातील सोलन जिह्यातील अंजली रेयात या 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. अंजली या भारतीय तरुणीसह जर्मन महिला जेनिफर हेनझोल यांचाही मृत्यू झाला. कॅरेबियन किनाऱयाजवळ ड्रग्ज माफियांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान ही घटना घडली आहे.  या घटनेत अन्य तीन पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisements

अंजली रेयात ही आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. ती व्यवसायाने इंजिनियर तसेच ट्रव्हल ब्लॉगर होती. अंजली आपल्या ब्लॉगद्वारे लोकांना जगातील पर्यटन स्थळांबाबत माहिती देण्याचे काम करत असे. सध्या ती सॅन जोस, कॅलिफोर्निया, यूएसए येथे राहत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ती मूळची हिमाचल प्रदेशातील सोलन येथील हाउसिंग बोर्ड कॉलनीतील रहिवासी असून तिच्या वडिलांचे नाव केडी रेयात असे आहे.

Related Stories

आंध्रमध्ये वायू गळती, 11 बळी

Patil_p

‘पोषण’ माध्यान्ह आहार योजनेला कालावधीवाढ

Patil_p

‘योद्धय़ां’ना 13 रोजी लसीचा दुसरा डोस

Patil_p

जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करावा

datta jadhav

केरळात चिंतेचे वातावरण कायम

Patil_p

प्रदूषणावर दिल्ली सरकारला ‘सर्वोच्च’ फटकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!