तरुण भारत

सिंधुचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

वृत्तसंस्था/ ओडेन्सी

येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या 1000 पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची टॉप सीडेड बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. कोरियाच्या आठव्या मानांकित सेंयांगने सिंधूचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

Advertisements

या स्पर्धेत महिला एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोरियाच्या सेयांगने पी.व्ही. सिंधूचा 36 मिनिटांच्या कालावधीत 21-11, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. सिंधूने यापूर्वी सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताला पदक मिळवून दिले होते.  कोरियाच्या सेयांगने दोन वर्षांपूर्वी एका स्पर्धेत सिंधूचा सरळ गेम्समध्ये पराभव केला होता.

पुरूष एकेरीत भारताच्या समीर वर्माला दुखापतीमुळे उपांत्यपूर्व सामन्यातून निवृत्त व्हावे लागले. समीर वर्मा आणि इंडोनेशियाचा सुगियार्तो यांच्यात झालेल्या या सामन्यात सुगियार्तोने पहिला गेम 21-17 असा जिंकला होता. त्यानंतर दुसरा गेम चालू झाल्यानंतर समीरने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. वर्माने गुरूवारी या स्पर्धेत डेन्मार्कच्या अँटोनसेनचा पराभव उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान दुसऱया फेरीतच संपुष्टात आले आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन ऍक्सलसेनने लक्ष्य सेनचा 21-15, 21-7 असा पराभव केला.

Related Stories

केन विल्यम्सन दुसऱया कसोटीमधून बाहेर

Patil_p

क्रिकेटपटूंना कोरोनाची सवय करून घ्यावी लागेल : गंभीर

Patil_p

सुमित नागल उपउपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

आशियाई सांघिक टेटे चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक

Patil_p

व्हिसाची हमी दिल्यास पाकिस्तान दहशतवाद थांबवणार का?

Patil_p

जॉफ अलार्डाईस आयसीसीचे नवे सीईओ

Patil_p
error: Content is protected !!