तरुण भारत

पळशीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

प्रतिनिधी/ म्हसवड

पळशी (ता. माण) येथील जाधववस्ती येथे दादासाहेब गुलाबराव जाधव यांच्या राहत्या घरात शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घरगुती गॅसचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात संसारोपयोगी साहित्य, जळून खाक झाले आहे. सुदैवाने स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisements

या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दादासाहेब गुलाबराव जाधव हे येथील जाधववस्ती येथे त्यांच्या कुटुंबा समवेत छपराच्या घरात राहत असून त्यांच्या पत्नी सकाळी साडे आठच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी घरात गेल्या. गॅस सुरू करताच रेग्युलेटरने अचानक पेट घेतला. त्यामुळे सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले. अवघ्या काही क्षणातच गॅसचा मोठा स्फोट झाला. गॅसचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ मदतीला धावले व आग विझविण्याचा प्रयत्न केला पण गवती छप्पर असल्याने आग आटोक्यात आली नाही. 

स्फोटाने घराच्या भिंतींचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली असून घरातील सर्व साहित्य, धान्य, कागदपत्रे, दहा हजाराची रोकड, दीड तोळे सोने, मुलांची वह्या पुस्तके आदी साहित्य जळून खाक झाल्याने जाधव कुटूंब उघडय़ावर पडले आहे. घटनेचे वृत्त समजताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. स्फोटात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जाधव कुटुंबियांना मदतीची गरज आहे.

Related Stories

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

Patil_p

सातारा जिल्ह्यात 77 नागरिकांना आज डिस्चार्ज; 386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात जागर अस्मितेचा अभियान सुरू

Abhijeet Shinde

सातारा : नागठाणेत चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

चौकीचाआंबा ( भोसरे ) येथे मान्यवरांचे स्मृतीदिन साजरे

Amit Kulkarni

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तीसाठी तरतूद करण्यात येणार

Patil_p
error: Content is protected !!