तरुण भारत

गुहागर, रत्नागिरीतील पाचही आरोपींच्या घरांची झडती

प्रतिनिधी/ चिपळूण

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरमधील शिंदे-आंबेरी, गुहागरमधील वेळंब येथे गुरूवारी व्हेल माशाची कोटय़वधी रूपये किंमतीची उलटी जप्त केल्यानंतर त्या तस्करीतील सहभागी असलेल्या जिल्ह्य़ातील पाचहीजणांच्या घरांची शनिवारी वनविभागाच्या पथकाने झडती घेतली.

Advertisements

 संगमेश्वरजवळील शिंदे-आंबेरी येथे इर्टिगा कारमध्ये 6 किलो 200, तर गुहागरमधील वेळंबमध्ये 2 किलो 150 गॅम वजनाची व्हेलची उलटीसह वाहने पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने जप्त केली. या कारवाईत रत्नागिरीतील प्रसाद प्रवीण मयेकर. काखरतळे-महाड येथील नरेंद्र वसंत खाडे, माणगांव येथील सत्यभामा राजू पवार व गुहागरमधील असगोली येथील अजय राजेंद्र काणेकर, परचुरी येथील तौफीक याकुब अलवारे, मिरजोळे येथील अब्दूल मजिद इस्माईल तांबे, वेळंब येथील चंद्रकांत शंकर कातळकर या सातजणांना अटक करण्यात आली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

  यातील दोघेजण रायगड जिल्हय़ातील असून रत्नागिरीतील मयेकर, असगोलीतील काणेकर, परचुरीतील अलवारे, मिरजोळेतील तांबे, वेळंबमधील कातळकर या पाचजणांच्या घरी जात वनविभागाच्या पथकाने झडती घेतली. मात्र यामध्ये काहीही सापडलेले नसल्याचे वृत्त आहे. या तस्करीची पाळेमुळे उघडकीस आणण्यासाठी वनविभागाकडून वेगवेगळय़ा मार्गाने तपास सुरू आहे.

Related Stories

कोल्हापूर : ऊसाची ट्रॉली अंगावर पलटी होवून एक ठार ; दोघे गंभीर जखमी

Abhijeet Shinde

बेंगळूर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वीर सावरकर उड्डाणपुलाचे उद्घाटन

Abhijeet Shinde

Maharashtra Rain: राज्यात पुढील २ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

Abhijeet Shinde

शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

GAURESH SATTARKAR

साताऱयात विकेंडला ‘शटर डाऊन’

Patil_p

कर्नाटक: ग्रामीण भागात उत्तम परिवहन सेवा देणार : सवदी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!