तरुण भारत

चॅलेंजर्स यू-19 क्रिकेट स्पर्धेसाठी उदीत यादव,सावली कोळंबकरची निवड

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

गोव्याच्या दोन क्रिकेटपटूंनी 19 वर्षांखालील चॅलेंजर्स एक दिवशीय क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे. सावली कोळंबकरने जयपूरात 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया 19 वर्षांखालील मुलींच्या एकदिवशीय संघात स्थान मिळविले आहे. लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज असलेल्या सावलीने हल्लीच  झालेल्या एकदिवशीय स्पर्धेतील चार सामन्यांतून 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Advertisements

गोव्याच्या 19 वर्षांखालील संघातील ऑफस्पिनर उदीत यावदनेही अहमदाबादेत 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया 19 वर्षांखालील चॅलेंजर्स चषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळविले आहे. उदीतने खेळलेल्या चार एकदिवशीय लढतीतून 9 विकेट्स मिळविल्या होत्या. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर आणि सचिव विपुल फडके यांनी या दोन्हीही क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

रस्ता करात सूट दिल्याने सरकारचाही फायदाच

Patil_p

कळंगूट येथे दगडाने ठेचून फेफरिनो बरेटोचा खून

Patil_p

13 हजार शेतकरी दाखवा, आम्ही संघटना बंद करु !

Amit Kulkarni

संघटितपणे कार्य केल्यास साखळी जिंकणे सोपे

Amit Kulkarni

राष्ट्रपतांनी हुतात्मा स्मारकावर वाहिली पुष्पांजली

Patil_p

प्रियोळातील कार्यकर्त्यांना धमकी व मारहाण

Amit Kulkarni
error: Content is protected !!