तरुण भारत

वरेरकर नाटय़ संघाच्या ‘एकपात्री नाटय़’ स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

वरेरकर नाटय़ संघातर्फे आयोजित ‘शब्द’ या एकपात्री अभिनय स्पर्धेचे  उद्घाटन शनिवारी झाले. टिळकवाडी येथील वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात नटराज पूजनाने स्पर्धेची सुरुवात झाली. शारदोत्सवाच्या माजी अध्यक्षा आशा रतनजी व जीएसएस पीयु कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनीच स्पर्धेचे परिक्षण केले.

Advertisements

प्रारंभी रंगकर्मी अनिरुद्ध ठुसे यांनी प्रास्ताविक करून मागील दोन स्पर्धांमधील अनुभव कथित केला. नीता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना आशा रतनजी म्हणाल्या, अभिनयातील भावना देहबोली व शब्दांमधून प्रक्षेकांच्या मनाला भिडायला हव्या. तर तो अभिनय परिपूर्ण ठरतो. असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेच्या सुरुवातीला मेधा भंडारी यांनी संजय पवार लिखित ‘फ्लाईंग क्विन’ ही नाटिका सादर केली. दिनेश कणबरकर याने पु. ल. देशपांडे यांच्या ‘खिल्ली’ पुस्तकातील प्रसंग सादर केला. शीतल पाटील यांनी संगीत स्वयंवर हे नाटय़ संगीत सादर केले. अनुष्का आपटे हिने देखील सुंदर अभिनय केला. स्पर्धेमध्ये बेळगाव परिसरातील स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट अभिनय 1- जितेंद्र रेडकर (उध्वस्त धर्मशाळाःश्रीधर), 2 योगिता हुंचीनहट्टी (ती फुलराणी मंजुळा), विशेष लक्षवेधी अभिनय-अनुष्का आपटे (स्वयंवरः रुक्मिणी), उत्तेजनार्थ-1 हेमांगी प्रभू (चारचौघीःविद्या), 2 अंकिता कदम (चारचौघीःविद्या), नम्रता कुलकर्णी ( स्वयंवर-रुक्मिणी).

Related Stories

प्रशासनातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Amit Kulkarni

यंदा नववर्षाच्या स्वागतावरही कोरोनाची छाया

Patil_p

औद्योगिक कामगारांची पोलिसांकडून अडवणूक

Amit Kulkarni

शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाईची समस्या

Amit Kulkarni

उचगावच्या नवविवाहितेची आत्महत्या

Omkar B

स्मार्ट सिटीची कामे रखडली; रस्त्यांवर अडथळय़ांची शर्यत

Patil_p
error: Content is protected !!