तरुण भारत

यशवंतपूर-चंदीगड रेल्वे 3 नोव्हेंबरपासून धावणार

प्रतिनिधी/ बेळगाव

यशवंतपूर-चंदीगड ही द्विसाप्ताहिक रेल्वे (क्र.06239-06240) बेळगावमधून धावणार आहे. येत्या 3 नोव्हेंबरपासून ही रेल्वे सुरू होणार आहे. यशवंतपूर येथून प्रत्येक बुधवारी व शनिवारी रेल्वे धावणार आहे. यामुळे बेळगावमधून दिल्ली व पंजाबला जाणाऱया नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.

Advertisements

यशवंतपूर येथून दुपारी 1.55 वा. निघणारी रेल्वे रात्री 12.30 वा. बेळगावला पोहोचणार आहे. त्यानंतर मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झाशी, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानीपत, अंबाला येथून चंदीगड येथे पोहोचणार आहे. चंदीगड येथून प्रत्येक मंगळवारी व शनिवारी रेल्वे निघणार आहे. चंदीगड येथून दुपारी 3.35 वा. निघणारी रेल्वे दुसऱया दिवशी सायंकाळी 6.50 वा. बेळगावला पोहोचेल. एकूण या रेल्वेला 24 डबे जोडण्यात आले आहेत.

Related Stories

बी . ई. इंजिनिअरिंगमध्ये शिवानी दळवीचे यश

Amit Kulkarni

शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण

Patil_p

चार महिन्यांपासून धोकादायक विद्युत टॉवरकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

युवकाचा खून पूर्ववैमनस्यातून ; सहा जणांना अटक

Patil_p

माजी महापौर सरिता पाटील आचारसंहिता भंग खटल्यातून निर्दोष

Patil_p

हनुमाननगर येथे लसीकरण मोहीम

Amit Kulkarni
error: Content is protected !!