तरुण भारत

श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर पुण्यतिथी उत्सवाची सांगता

पालखी सेवा उत्साहात, पंतनामाचा गजर

वार्ताहर/ सांबरा

Advertisements

श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त पालखी सेवा उत्साहात पार पडली. भक्तांची उपस्थिती कमी असली तरी उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. त्यामुळे पंतबाळेकुंद्रीत पंतनामाचा गजर झाला.

प्रारंभी शनिवारी पहाटे 5 वाजता पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी साडेसात वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. पालखीत श्रींची उत्सवमूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत पारंपरिक श्रींची पदे व आरती म्हणण्यात येत होती.

त्यानंतर सकाळी अकरा वाजता श्रींची पालखी सेवा पार पडली. दरवर्षी पालखी सेवा रात्रीच्यावेळी असायची. मात्र यंदा दोन दिवस उत्सव साजरा करण्यात येत असल्याने पालखी सेवा सकाळच्यावेळी करण्यात आली. यावेळी पारंपरिक लवाजामासह पालखीच्या मुख्य मंदिराला तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. तर दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 5 वाजता प्रेमानंद टिपरीचा कार्यक्रम झाला.

सायंकाळी सहा वाजता परतीच्या पालखी सेवेला प्रारंभ झाला. भाऊसाहेब कट्टा, गोपाळ कट्टा, नरसिंह मंदिरकडे जात पालखी प्रेमध्वज कट्टय़ाकडे आली. तेथून सीताराम मंदिर आल्यानंतर श्रींची आरती व पदे म्हणून उत्सवाची सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्त श्री घराण्यातील मंडळीसह मोजकेच 400 भक्त पंतबाळेकुंद्रीत दाखल झाले होते.

Related Stories

जाचक कायद्याविरोधात शेतकऱयांची पुन्हा निदर्शने

Patil_p

जुगार खेळणाऱया 9 जुगाऱयांना अटक

Patil_p

सावधान… आता जलवाहिन्यांसाठी रस्ताखोदाई

Amit Kulkarni

नर्सरीतील प्लास्टिक मुक्तीचा निर्णय हवेतच

Amit Kulkarni

सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने बसवराज नरवाडे सन्मानित

Patil_p

आजपासून मुसळधार पाऊस

Omkar B
error: Content is protected !!