तरुण भारत

बनावट यादी बनवून पूरग्रस्तांची फसवणूक

कोगनोळी वंचित आघाडीतर्फे आरोप

वार्ताहर/ कोगनोळी

Advertisements

सन 2021 मध्ये कोगनोळी परिसरात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे सकल भागात असणाऱया घरामध्ये महापुराचे पाणी शिरले होते. अनेक घरांची पडझड झाली होती. नुकसान भरपाई म्हणून सरकारने विशेष मदत जाहीर केली. ग्रामपंचायत विकास अधिकारी व नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत महापूर आलेल्या आणि पावसाने घरे कोसळलेल्या घरांचा सर्व्हे करण्यात आला. पण महापूर आणि अतिवृष्टीने पडलेल्या घरांची बनावट यादी तयार करुन कोगनोळी ग्रामपंचायतीकडून सरकारची दिशाभूल केल्याबदल निपाणी तहसीलदार व तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोगनोळी येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने मुख्य लाभार्थ्यांना वगळून आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळवून देणे, एकाच घरावर अनेक जीपीएस करणे अशा प्रकारे सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यादी तात्काळ रद्द करावी, नव्याने सर्व्हे करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी ता.पं. मुख्याधिकारी आणि तहसीलदारांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी निपाणी तालुका संघटक करण कांबळे, काशीनाथ आवटे, रामदास ढोबळे, सुधीर माने, महावीर आवटे, सुरेश शिंत्रे, नरजित विटे, विलास कोरवी आदी उपस्थित होते.

Related Stories

‘जीएसएस’च्या परिषदेचा शुभारंभ

Amit Kulkarni

कर्नाटकचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा होम क्वारंटाईन ; कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची सांगता

Patil_p

बेळगुंदी गावात लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद

Patil_p

हिंदूंच्या मंदिरांना हात लावाल तर याद राखा!

Amit Kulkarni

लोकमान्य दुर्वांकुर ठेव योजनेचा शुभारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!