तरुण भारत

“आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदाराचा दावा धक्कादायक”

ऑनलाईन टीम / मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आज ट्विट करून आर्यन खानचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या साक्षीदाराने केलेला दावा हा धक्कादायक असून पोलिसांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे. तसेच महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी हे खटले केले आहेत. आणि हे खरे होताना दिसत आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाची आठवण त्यांनी करून दिली.

Advertisements

के. पी. गोसावीचा वैयक्तिक अंगरक्षक असलेला प्रभाकर सेल याने असा दावा केला की के.पी. गोसावी आणि सॅम डिसोझा यांच्यात 18 कोटींचा करार केला होता. त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. राऊत यांनी 12 सेकंदाचा व्हिडिओ देखील ट्विट केला असून ज्यामध्ये के.पी. गोसावी आणि आर्यन खान एनसीबी कार्यालयात बसलेले दिसत आहेत. गोसावी एक फोन धरून आहे, ज्यामध्ये आर्यन खान बोलत आहे. केपी गोसावी, प्रभाकर सेल यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले केपी गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यामधील दूरध्वनी संभाषण ऐकलं आहे. के.पी. गोसावी सॅमशी फोनवर बोलताना म्हणाला की तुम्ही 25 कोटींचा बॉम्ब ठेवला आहे आणि आपण 18 मध्ये फायनलला करूया कारण आम्हाला समीर वानखेडेला सुद्धा 8 कोटी द्यायचे आहेत. असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.के.पी. गोसावी यांच्या सूचनेनुसार त्यांनी दोन बॅगमध्ये रोख रक्कम गोळा केली आणि सॅम डिसुझा यांना दिली. असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सुरुवातीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकलेल क्रूझ जहाजावरील रेव्ह पार्टीचा समावेश असलेले प्रकरण हे महाराष्ट्र सरकार आणि भाजप यांच्यातील ताज्या राजकीय वादाचे कारण बनले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणाद्वारे भाजपवर राज्य सरकारला लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दसऱ्याच्या मुहूर्तावर केलेल्या भाषणात भाजपला गुजरातमधून 3000 कोटींच्या अमली पदार्थांची आठवण करून दिली होती.

Related Stories

महाराष्ट्रात 77 हजार 618 सक्रिय रुग्ण 

Rohan_P

राज्य भाजपमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावर गोंधळ नाहीः मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

बिहारमध्ये दिवसभरात 309 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 6,753 नवे रुग्ण; 167 मृत्यू

Rohan_P

जन औषधी दिवस : महिलेच्या ‘त्या’ वक्तव्यानं मोदी झाले भावूक

tarunbharat

गेल्या 6 महिन्यानंतर उत्तराखंडात काल पहिल्यांदाच केवळ 54 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!