तरुण भारत

ऑस्करच्या स्पर्धेत विद्या आणि विकी

जगभरात 94 व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. सिनेसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार भारतातील एका चित्रपटाला मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे. दरम्यान येत्या ऑस्कर पुरस्कार 2022 च्या नामांकनासाठी एकूण 14 भारतीय चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे.

यात 14 चित्रपटांच्या यादीत बॉलिवूडमधील ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे यातील कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘शेरनी’ चित्रपट व अभिनेता विकी कौशलचा ‘सरदार उधम’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यासोबतच प्रादेशिक चित्रपटांमध्ये योगी बाबू यांचा ‘मंडेला’, मल्याळम भाषेतील ‘नयट्टू’ चित्रपटाचे नाव शॉर्टलिस्ट केले गेले आहे.

Advertisements

त्यामुळे ऑस्करच्या तिकीटासाठी ‘शेरनी’ आणि ‘सरदार उधम’ या दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

Related Stories

बॉलीवूडवर कोरोनाचे सावट; भूमी पेंडणेकर, विकी कौशल आणि शुभांगी अत्रे पॉझिटिव्ह

Rohan_P

शेवंताचा रामराम

Patil_p

‘पुष्पा’ने 3 दिवसात कमाविले 173 कोटी

Patil_p

24 डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘अतरंगी रे’

Patil_p

शिवलिला पडली घराबाहेर

Patil_p

मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांकडून अटक

Rohan_P
error: Content is protected !!