तरुण भारत

देबिनाने केलं टक्कल…

कलाकार हे काही काळ का असेना त्यांची पडदय़ावरची भूमिका जगत असतात. त्या भूमिकेसाठी काहीही मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. साहजिकच एखादय़ा भूमिकेसाठी आवशयक असलेला लूक येण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते. कधी वजन वाढवलं जातं तर कधी ते कमी केलं जातं. अभिनेत्री देबिना हिने तर तिच्या एका भूमिकेसाठी विग न वापरता खरोखरच टक्कल केलं आहे. इन्स्टापेजवर देबिनाने तिचा हा नवा लूक शेअर केला आहे. छोटय़ा पडद्यावर देबिना बॅनर्जी आणि गुरमित चौधरी यांची जोडी खूप गाजली, त्यांना एकत्र पाहण्यासाठी नेहमीच चाहते उत्सुक असतात. चाहत्यांची ही इच्छा शुभो बिजोया या लघुपटातून पूर्ण होणार असून या शॉर्टफिल्मसाठीच देबिनाने हे टक्कल केलं आहे. आनंदात राहणाऱया एका जोडप्याच्या आयुष्यात अशी एक घटना घडते की त्यामुळे त्यांचे सगळे आयुष्यच बदलून जाते. यामध्ये देबिना टक्कल लूकमध्ये दिसणार आहे. तर गुरमित या लघुपटात अंध व्यक्तीच्या भुमिकेत दिसणार आहे. 11 वर्षानंतर ही जोडी एकत्र क्रीन शेअर करणार आहे. देबिनाचा हा लूक पाहण्यासाठी तिचे चाहते चांगलेच आतूर झाले आहेत.

Related Stories

‘पैंजण तुझं’ हे रोमँटिक कोळीगीत वाजणार

Patil_p

मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलं तर… मनसेचा कंगनाला इशारा

Rohan_P

‘स्कॅम 1992’ची अभिनेत्री विवाहबद्ध

Amit Kulkarni

कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

Rohan_P

प्रदर्शनापूर्वीच ‘आरआरआर’ची 900 कोटींचा कमाई

Patil_p

ओटीटीवर क्रिती सेनन करणार पदार्पपण

Amit Kulkarni
error: Content is protected !!