तरुण भारत

विमानतळावर होतात जास्त वेदना

प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांना गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो. सुधा चंद्रन यांनी काही वर्षांपूर्वी एका अपघातात आपला एक पाय गमावला होता. त्यानंतर कृत्रिम पाय लावत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र जेव्हा कधी त्यांना प्रवास करावा लागतो, तेव्हा विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांना त्यांचा कृत्रिम पाय काढण्यास सांगितला जातो. असं अनेकदा झाल्यामुळे अखेर सुधा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपली व्यथा सांगितली. या व्हिडिओ पोस्टमध्ये सुधा यांनी म्हटलं आहे की, मी जेव्हा कधी मी माझ्या कामानिमित्त बाहेर जाते, तेव्हा नेहमी मला विमानतळावर रोखलं जातं. जेव्हा मी सुरक्षारक्षक आणि सीआयएसएफ अधिकाऱयांना विनंती करते की कृपया माझ्या कृत्रिम पायासाठी ईटीडी म्हणजेच स्फोटक तपासणी यंत्रणेदवारे टेस्ट करा, तेव्हा ते मला माझा कृत्रिम पाय काढून दाखवण्यास सांगतात. त्या प्रत्येकवेळी कृत्रिम पाय काढताना खूप वेदना होतात. मी तुम्हाला विनंती करते की ज्याप्रकारे ज्येष्ठ व्यक्तींना कार्ड देतात, त्याप्रकारे माझ्यासारख्या लोकांसाठीही काहीतरी कायमस्वरूपी कार्ड देण्याची व्यवस्था करावी, असं त्या व्हिडीओत म्हणाल्या. सुधा चंद्रन यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Stories

आइस स्केटिंग करणारा श्वान

Amit Kulkarni

कोल्हापूर : अभिनेते महेश कोठारे यांनी घेतली मंत्री यड्रावकर यांची सदिच्छा भेट

Abhijeet Shinde

ऋतिकसोबत दिसून येणार दीपिका

Patil_p

कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

Rohan_P

‘सांगते ऐका’ मध्ये सोनालीबद्दल न ऐकलेल्या गोष्टी

Omkar B

कायद्याच्या परीक्षेत किम कर्दाशियां नापास

Patil_p
error: Content is protected !!