तरुण भारत

रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार

51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार – कन्याकडून निर्मित ऍपचे करणार लाँचिंग

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisements

सुपरस्टार रजनीकांत यांना नवी दिल्ली येथे 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटक्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याप्रकरणी त्यांचा हा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा एप्रिल महिन्यातच झाली होती. पण आता डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल इंडियाने सोशल मीडियावर 25 ऑक्टोबर रोजी रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

रजनीकांत यांनीही स्वतःच्या जीवनातील या सर्वात मोठय़ा दिवसाबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी कन्या सौंदर्या विशगन हिच्या कार्याची माहिती दिली आहे. स्वतःचे गुरु केबी (के. बालचंद्र) हे आपल्याला पुरस्कारप्राप्त करताना पाहण्यासाठी हयात नसल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.

25 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाचा का आहे हे रजनीकांत यांनी तमिळ आणि इंग्रजीत एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. उद्याचा (आजचा म्हणजेच सोमवार) माझ्यासाठी दोन कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिले कारण म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार, लोकांचे प्रेम आणि समर्थनामुळे भारत सरकारकडून मला प्रदान करण्यात येत आहे. तर माझी मुलगी सौंदर्या विशगनने स्वतःच्या प्रयत्नांद्वारे ‘हूट’ ऍप तयार करण्याचा विडा उचलला आहे आणि ती आता हा ऍप जगासमोर सादर करणार आहे. लोक आता स्वतःच्या आवाजाच्या माध्यमातून स्वतःचे विचार व्यक्त करू शकतात. इच्छा आणि विचारांप्रमाणेच आता स्वतःच्या पसंतीच्या कुठल्याही भाषेत लिखित स्वरुपात विचार मांडू शकतात. मला माझ्या आवाजात या अभिनव, उपयुक्त आणि वेगळय़ा प्रकारचा ‘हूट’ ऍप सादर करण्यास अत्यंत आनंद होतोय, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

रजनीकांत यांनी 1975 मध्ये दिग्दर्शक के. बालचंद्र यांच्या अपूर्व रागंगल या चित्रपटातून पदार्पण केले होते. चार दशकांहून अधिक काळापर्यंत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले आहे. अन्नात्थे या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ते सध्या प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे.

Related Stories

शाळांमध्ये सुरु झाले घटना वाचन

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर नवा विक्रम

Patil_p

गंभीर स्थितीतही आम्ही सज्ज!

Patil_p

राज्यात दिवसभरात 464 रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

शेतकरी आंदोलकांना पुन्हा ‘सुप्रिम’ चपराक

Patil_p

आंध्रप्रदेश सरकारने घेतला विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय

prashant_c
error: Content is protected !!