तरुण भारत

जागा अडवणाऱ्यांना घरी बसवा : आ. शिवेंद्रराजे

प्रतिनिधी / सातारा :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नाव देशात आहे. गेले पाच वर्ष मी चेअरमन म्हणून चांगले काम केले आहे. मात्र, गेल्या तीन चार दिवसात स्टेटमेंट पहातोय, ऐकतोय. ते लोक जिल्हा बँकेत येतात किती?, त्यांनी किती वेळा बँकेत सभासदांच्या हिताचे ठराव मांडले. किती मिटींगला उपस्थित होते?, कार्यबाह्युल्यच्या नावाखाली रजेचे अर्ज टाकायचे. जागा अडवायची. अशी भावना असलेल्यांना घरी घालवा, असा निशाणा आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंचे नाव न घेता लगावला.

Advertisements

जिल्हा मध्यवर्ती बँकेत अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवेंद्रराजे म्हणाले, शेवटचा दिवस असल्याने सगळय़ांनी अर्ज भरला आहे. सातारा विकास सेवा सोसायटीतून माझा अर्ज दाखल केला आहे. मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक गेली पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आहे. राज्यात, देशात नावलौकीक कायम राहिला आहे. अशा पद्धतीने बेकेचे कामकाज झालेले आहे. आता आमच्यावर सर्व सभासदांचा विश्वास आहे. आमच पॅनेल झाले आहे. त्यावर सभासदांचा विश्वास आहे. कोणी काहीजरी स्टेटमेंट करत असले तरीही आमच्या पॅनेलचे उमेदवार 100 टक्के विजयी होणार आहेत. उमेदवारांची नावे कोणती हे लवकरच समजेल. चेअरमन म्हणून पाच वर्ष काम केले. काही स्टेटमेंट दोन तीन दिवसात वाचल्या आणि पाहिले. काही लोक ज्या सभासदांनी बँकेत येवून किती वेळा ठराव मांडले. किती मिटींगला उपस्थित होते. कार्यबाह्युल्यच्या नावाखाली रजेचे अर्ज टाकायचे. जागा अडवायची. जिल्हा बँकेचे देशात नाव आहे. संचालक म्हणून नुसते नाव लागले पाहिजे. अशी भावना समजून कोण लढत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवून घरी बसवले पाहिजे, असे खासदार उदयनराजेंचे नाव न घेता स्पष्ट मत शिवेंद्रराजेंनी व्यक्त केले.

Related Stories

सातारा : आखाडे सुरू करण्यासाठी मल्लविद्या महासंघाची जिल्हाधिकारी यांचेकडे धाव !

Abhijeet Shinde

बालाजी लॅबकडून कॉमन पॅसेजमध्ये कोरोना टेस्टिंग

datta jadhav

वाकळवाडीत कोरोनाबाधिताची संख्या पोहचली तीनवर

Patil_p

रिक्षावाल्या काकांना गुरुकुलच्या चिमुकल्यांकडून मदतीचा हात

datta jadhav

शिवजयंती साजरी झाली पाहिजे

Patil_p

सातारा : कोरोना कामकाजाची प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!